तरुण भारत

अभिनयासाठी आत्मविश्वास महत्वाचा आहे!

अभिनेता भरत जाधव यांचे मत : कुडाळ महाविद्यालयात अभिनय कौशल्य पदविका अभ्यासक्रमाचे उद्घाटन : यशाचे शिखर गाठल्यानंतर उतू-मातू नका!

वार्ताहर / कुडाळ:

Advertisements

अभिनय करणे सोपे नाही. त्याकरिता तुमचा पाया मजबूत असणे गरजेचे आहे. अभिनयासाठी आत्मविश्वास महत्वाचा आहे. रंगभूमीवर श्रद्धा ठेवली, तर ती भरभरून देते. मात्र, शास्त्रायुक्त अभिनय कौशल्य आत्मसात करा. या कलेत नाव कमवा. मोठे व्हा. पण यशाचे शिखर गाठल्यानंतर उतू नका. मातू नका, असा संदेश सिने-नाटय़ अभिनेते भरत जाधव यांनी येथील कलाकार व विद्यार्थ्यांना येथे दिला.

कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या नाटय़शास्त्र विभागाच्यावतीने अभिनय कौशल्य पदविका अभ्यासक्रम सुरू होत आहे. त्याचे उद्घाटन जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे होते. व्यासपीठावर मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग उपकेंद्राचे प्रभारी संचालक श्रीपाद वेलिंग, संस्थेचे उपकार्याध्यक्ष भाई तळेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट, संस्थेचे सहकार्यवाह आनंद वैद्य, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ व्ही. जी. भास्कर आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलनानंतर वेलिंग यांच्या हस्ते सरस्वती पूजन, तर शिरसाट यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले.

जाधव म्हणाले, फक्त अभिनय येऊन चालत नाही, तर त्यातील अधिक कौशल्यासाठी शास्त्राrय शिक्षणाची गरज आहे. त्याच दृष्टीकोनातून ही संस्था, महाविद्यालय व शिक्षकांनी सकारात्मक पाऊल टाकले आहे, याचा आपल्याला एक कलाकार म्हणून आनंद आहे. जिल्हय़ातील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा लाभ होणार आहे. येथे हा अभ्यासक्रम सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न करणारी संस्था व पालकमंत्री उदय सामंत यांचे त्यांनी अभिनंदन केले. युवापिढीने या कलेत प्रगती करावी. यात चांगले शिक्षण घेऊन कलाकार म्हणून मोठे यश व प्रसिद्धी मिळाल्यानंतर जुन्या गोष्टी व आपल्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, त्यांना विसरून चालणार नाही, असेही ते म्हणाले.

शशिकांत गावडे म्हणाले, संस्थेचे आनंद वैद्य, केदार सामंत यांनी हा अभ्यासक्रम सुरू व्हावा, यासाठी खूप मेहनत घेतली. मालवणी माणूस नाटकाचा चाहता आहे. त्याच्या रक्तात कला आहे. चंदू शिरसाट यांनी अनेक कलाकार घडविले. येथील विद्यार्थ्यांना नाटय़कलेचे शास्त्राsक्त शिक्षण मिळावे, यासाठी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. संपूर्ण विद्यापीठात याच ठिकाणी हा अभ्यासक्रम सुरू होत असून आपल्या जिल्हय़ाला मिळालेला हा सन्मान आहे.

श्रीपाद वेलिंग म्हणाले, या चांगल्या अभ्यासक्रमाची अत्यंत गरज होती. येथील विद्यार्थ्यांना याच ठिकाणी शिक्षण मिळणार आहे. त्यांना बाहेर जावे लागणार नाही. नवीन शैक्षणिक धोरणात खूप बदल होणार आहेत. बदलत्या काळात वेगळय़ा प्रकारचे शिक्षण घेणे गरजेचे आहे. प्रास्ताविकात आनंद वैद्य म्हणाले, येथील शिक्षण संस्थेने नाटय़, चित्रपट क्षेत्रातील कलाकार निर्माण केले. भविष्यात आणखीन अनेक कलाकार घडावेत, याच उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करीत आहोत. परिचय नाटय़शास्त्र विभागप्रमुख प्रा. संतोष वालावलकर, सूत्रसंचालन प्रा. डॉ. रवींद्र ठाकुर, तर स्वागत व आभार प्रभारी प्राचार्य डॉ. भास्कर यांनी मानले. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी तसेच कलाप्रेमी उपस्थित होते.

Related Stories

जिह्यामध्ये एसटी प्रवासी संख्येत मोठी वाढ

Patil_p

NIKHIL_N

देवगडमधील मच्छीमारांना नुकसान भरपाईचे वितरण

NIKHIL_N

दोडामार्गला जागतिक कन्या दिन

NIKHIL_N

चिपळुणात चाकू हल्ल्यात एक जखमी

Patil_p

जिह्यात सलग दुसऱया दिवशी 23 नवे रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!