तरुण भारत

नोव्हेंबरमध्ये वाहन विक्री प्रभावीत

खरीपासह अन्य कारणांचाही कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

ऑटोमोबाईल कंपन्यांकडून नोव्हेंबर महिन्यातील वाहन विक्रीचे आकडे सादर करण्यात आले आहेत. यामध्ये एस्कॉर्ट्स ट्रक्टर व बजाज ऑटो यांची नोव्हेंबरमधील विक्री ही नुकसानीत राहिली असल्याची माहिती आकडेवारीमधून स्पष्ट झाली आहे. मागील काही दिवस कोरोनाच्या पहिल्या व दुसऱया लाटेमधून काहीसे सावरत गेल्याची सकारात्मक स्थिती निर्माण होत असातानाच पुन्हा एकदा वाहन विक्री काहीशी प्रभावीत होताना दिसत आहे. यामध्ये विविध कारणांचाही समावेश राहिला आहे.

या संदर्भातील काही कंपन्यांची स्थिती

एस्कॉर्ट्स ट्रक्टरची विक्री 47.3 टक्क्यांनी घसरणीत

एस्कॉर्ट्स लिमिटेडची ट्रक्टर विक्री नोव्हेंबर महिन्यात खरीपातील पिकांच्या तोडणीमध्ये झालेला उशीर व इतर कारणास्तव ट्रक्टर विक्री प्रभावीत झाली आहे. यामध्ये विक्री 47.3 टक्के महिन्याच्या आधारे घटून 7,116 यूनिटवर राहिली आहे. देशातील बाजारामध्ये 13,514 व विदेशी बाजारात 624 यूनिटची विक्री झाल्याची नोंद आहे.

बजाज ऑटोची विक्री प्रभावीत

बजाज ऑटो लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात कंपनीने 3,79,276 इतक्या वाहनांची विक्री केली आहे जी ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत 13.7 टक्के कमी आहे. महिन्याच्या आधारे विक्रीची स्थिती पाहिल्यास देशात दुचाकींची विक्री 27.36 टक्क्यांनी घसरुन 1,58,755 वर राहिली आहे. दुसरीकडे दुचाकीची निर्यात ही 15.54 टक्क्यांनी घटून 2,20,521 वर राहिली. यासह एकूण व्यावसायिक वाहन विक्री ही 18 टक्क्यांनी घटली असल्याची माहिती आहे.

टीव्हीएस मोटारची विक्रीही घटली

टीव्हीएस मोटार कंपनीची नोव्हेंबर 2021 मध्ये एकूण वाहन विक्री ही 15 टक्क्यांनी घसरुन 2,72,693 इतकी राहिली आहे, अशी माहिती कंपनीने बुधवारी दिली आहे. टीव्हीएसने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कंपनीने मागील वर्षात समान महिन्यात 3,22,709 इतकी वाहन विक्री केली होती. मागील महिन्यात दुचाकी वाहनांची एकूण विक्री 2,57,863 इतकी राहिली होती. नोव्हेंबर 2021 मध्ये दुचाकीची विक्रीही 1,75,940 इतकी राहिली आहे. निर्यात मागील महिन्यात 30 टक्क्यांनी वधारुन 96,000 वर राहिली आहे.

Related Stories

बर्गर किंगचा आयपीओ 2 डिसेंबरला

Patil_p

शाओमीचा इलेक्ट्रिक एअर कॉम्प्रेसर बाजारात

Patil_p

अर्बन कंपनी 1,857 कोटी रुपये उभारणार

Patil_p

आयओसीचे जादा मायलेजयुक्त डिझेल सादर

Patil_p

चहा उत्पादन 54टक्के घटले

Patil_p

ऍपलकडून न्यूयॉर्कसह अन्य शहरांमधील स्टोअर राहणार बंद

Patil_p
error: Content is protected !!