तरुण भारत

कोरोनाने आणखी एका रुग्णाचा मृत्यू

जिल्हय़ात नव्याने एकही कोरोनाबाधित नाही : 51,683 रुग्णांनी केली कोरोनावर मात

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

Advertisements

जिल्हय़ात आणखी एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू होणाऱया रुग्णांची संख्या 1 हजार 458 वर गेली आहे. मात्र, बुधवारी नव्याने एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही.

आणखी एकाचा मृत्यू झाल्याने जिल्हय़ात आतापर्यंत कोरोनाने 1 हजार 458 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्याने एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 53 हजार 188 आहे. जिल्हय़ात बुधवारी एका रुग्णाला डिस्चार्ज दिला गेला. त्यामुळे आतापर्यंत 51 हजार 683 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्हय़ात आता 47 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील 8 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यापैकी 6 रुग्ण ऑक्सिजनवर तर 2 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड- 6546, दोडामार्ग- 2798, कणकवली- 10034, कुडाळ- 10965, मालवण- 7801, सावंतवाडी- 7676, वैभववाडी- 2398, वेंगुर्ले- 4712, जिल्हय़ाबाहेरील- 258.

तालुकानिहाय सक्रिय रुग्ण : देवगड- सहा, दोडामार्ग- एक, कणकवली- नऊ, कुडाळ- नऊ, मालवण- नऊ, सावंतवाडी- सात, वैभववाडी- शून्य, वेंगुर्ले- पाच, जिल्हय़ाबाहेरील- एक. तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू : देवगड- 180, दोडामार्ग- 43, कणकवली- 299, कुडाळ- 243, मालवण- 288, सावंतवाडी- 203, वैभववाडी – 82, वेंगुर्ले- 111, जिल्हय़ाबाहेरील- नऊ.

आरटीपीसीआर आणि ट्रुनॅट टेस्ट रिपोर्टस् : तपासलेले नमुने- बुधवारचे 110, एकूण 3,13,942. पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 38,079. ऍन्टिजन टेस्ट : तपासलेले नमुने : बुधवारचे 57, एकूण 2,82,658. पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 15,573.

Related Stories

खारफुटीच्या न्यायवैद्यिक माहिती संकलनात महाराष्ट्र नंबर वन..!

Omkar B

अभियंता तरुणाची सावंतवाडीत आत्महत्या

NIKHIL_N

सावंतवाडीत टेम्पो चालकावर खुनी हल्ला

NIKHIL_N

दिवाणखवटीतील तरूणाचा बीड येथे अपघाती मृत्यू

Abhijeet Shinde

दापोलीतील व्यापाऱयाची 30.73 लाखांना ऑनलाईन फसवणूक

Patil_p

गणपतीत चाकरमान्यांसाठीचे नियम आताच जाहीर करा!

NIKHIL_N
error: Content is protected !!