तरुण भारत

सीईओ सत्या नडेला यांनी निम्मे समभाग कंपनीला विकले

निम्मे समभाग विकल्याची  वॉलस्ट्रीट जर्नलच्या एका अहवालामधून माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी कंपनीमध्ये आपले जवळपास निम्मे समभाग विकले आहेत. सत्या नडेला यांच्याकडे मायक्रोसॉफ्टचे जवळपास 17 लाख समभाग होते. परंतु मागील दोन दिवसांमध्ये यातील 8,38,584 समभाग नडेला यांनी कंपनीला विकले आहेत, अशी माहिती वॉलस्ट्रीट जर्नलच्या एका अहवालामधून दिली आहे.

सदरच्या विक्रीतून नडेला यांना 28.5 कोटी डॉलरपेक्षा अधिकची रक्कम प्राप्त झाली आहे. इनसाइडरस्कोरनुसार नडेलाची सर्वात मोठी विक्री असल्याचे नमूद केले आहे. मायक्रोसॉफ्टचे प्रवक्ते यांनी यावेळी लिहिले आहे, की ‘सत्या यांनी व्यक्तिगत आर्थिक योजना आणि विविधकरणांसाठी जवळपास 8,40,000 समभाग विकले आहेत.

निर्णयामागे काय हेतू?

विश्लेषकांच्या मतानुसार सत्या नडेला यांनी हा निर्णय वॉशिंग्टनच्या त्या निर्णयामुळे घेतल्याचे समजते. आगामी वर्षाच्या प्रारंभामध्ये 250,000 डॉलर प्रति वर्षापेक्षा अधिकच्या लाँग टर्म कॅपिटल गेन्सवर (दीर्घ कालावधीच्या भांडवली नफा)7 टक्के कर लावण्याचा निर्णय वॉशिंग्टन राज्याने घेतल्याचे समजते.

2.53 लाख कोटी डॉलर बाजारमूल्य

नडेला हे सीईओपदी आल्यानंतर जगातील सर्वात मौल्यवान कंपनी म्हणून मायक्रोसॉफ्टची ओळख झाली. याचे कारण नडेला यांनी क्लाउड कंप्युटिंगच्या प्रणालीची विक्री मोठय़ा उद्योगांना केली होती. सध्या 2.53 लाख कोटी डॉलरच्या बाजारमूल्यासोबत कंपनी कार्यरत आहे.

Related Stories

बाजाराची पाचव्या दिवशीही तेजीची घोडदौड

Patil_p

मोबाईल वॉलेट कंपनी बदलता येणार

Amit Kulkarni

पेटीएमला शेवटच्या दिवशी प्रतिसाद

Patil_p

चौथ्या सत्रात सेन्सेक्सची 777 अंकांची उसळी

Amit Kulkarni

पारदर्शक स्मार्ट टीव्ही शाओमीकडून सादर

Patil_p

बाजारात सेन्सेक्सची 1,030 अंकांची उसळी

Patil_p
error: Content is protected !!