तरुण भारत

वाळू चोरीप्रकरणी सहाजणांना अटक

शनिवारपर्यंत पोलीस कोठडी : काळसे बागवाडी येथील ऑगस्ट महिन्यातील घटना

वार्ताहर / मालवण:

Advertisements

मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथील कर्ली खाडी पात्रात अनधिकृतपणे वाळू उपसा केल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली. संशयितांना मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी भानुप्रताप चौहान यांनी विशेष सहाय्यक सरकारी वकील ऍड. हृदयनाथ चव्हाण यांचा युक्तीवाद ग्राहय़ मानून संशयितांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीसांनी भादवि कलम 379, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये उदय सुधाकर नार्वेकर (45), विनोद गोपाळ नार्वेकर (51), सुदेश सुनील कोरगावकर (24), जयवंत मधुकर खोत (54), शाहु वाधु वरक (42), सखाराम वामन आचरेकर (42) या सहा जणांचा समावेश आहे.

21 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास उदय नार्वेकर, विनोद नार्वेकर, सुदेश कोरगावकर, जयवंत खोत, शाहु वरक, सखाराम आचरेकर व परप्रांतीय कामगार यांत्रिक बोटीने कर्ली खाडी पात्रात अनधिकृतपणे वाळू उपसा करीत होते. या घटनेचे संजय खोत यांनी मोबाईलद्वारे शुटिंग सुरू केले होते. शुटिंग सुरू आहे हे लक्षात आल्यावर संशयित उदय नार्वेकर, विनोद नार्वेकर, सुदेश कोरगावकर यांनी त्यांच्या होडय़ांमधून वाळूचे गोळे करून संजय खोत, मदन व सर्वेश यांना इजा होईल या हेतून त्यांच्या दिशेने फेकले. या घटनेनंतर फिर्यादी रामकृष्ण व्यंकटेश खोत यांनी मालवण पोलिसात तक्रार दिली. यात शासनाची वाळू अनधिकृतपणे चोरून नेली म्हणून आठजण तसेच अज्ञात 40 ते 50 परप्रांतीय कामगारांचा तक्रारीत समावेश होता. या फिर्यादीनुसार मालवण पोलिसांनी वरील सहा जणांबरोबरच अमृत सुधाकर नार्वेकर (काळसे बागवाडी), संदेश मठकर (कुडाळ) व 40 ते 50 कामगारांवर गुन्हा दाखल केला होता.

Related Stories

खाकी वर्दीला सुरक्षेची राखी

Ganeshprasad Gogate

मुंबईच्यामहापौर बनल्या कोविड योद्धय़ा

NIKHIL_N

जिल्हय़ातील 90 गावे कोरोना मुक्त

NIKHIL_N

इराणस्थित दोन युवक गावी परतले

NIKHIL_N

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा!

NIKHIL_N

सतीश सावंत यांनी जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा!

NIKHIL_N
error: Content is protected !!