तरुण भारत

शेअर बाजारात पुन्हा तेजीचे वातावरण

सेन्सेक्स 620 तर निफ्टी 184 अंकांनी मजबूत

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ात आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या बातमीमुळे नकारात्मक वातावरण राहिले असून यामध्ये कोरोनाची पुन्हा  चिंता निर्माण झाली आहे. परंतु याचा परिणाम हा भारतीय शेअर बाजावर झाल्याने दोन सत्रात सर्वाधिक अंकांची पडझड झाली होती, परंतु अखेर तिसऱया सत्रात बुधवारी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 620 अंकांसोबत बाजार सावरला असल्याचे पहावयास मिळाले आहे.

जागतिक बाजारातील सकारात्मक कल राहिल्याने यांचा परिणाम हा रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी आणि भारतीय स्टेट बँक यांच्या मजबूतीने सेन्सेक्स दिवसअखेर 619.92 अंकांनी वधारुन निर्देशांक 57,684.79 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 183.70 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,166.90 वर बंद झाला आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये बुधवारी सहा टक्क्यांच्या तेजीसोबत इंडसइंड बँक सर्वाधिक लाभात राहिली असून अन्य कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँक, स्टेट बँक, मारुती सुझुकी, टेक महिंद्रा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये डॉ.रेड्डीज लॅब, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, भारती एअरटेल आणि टायटन यांचे समभाग मात्र नुकसानीत राहिले होते.

आशियातील अन्य बाजारांपैकी हाँगकाँगचा हँगसेंग, चीनचा शांघाय कम्पोजिट, दक्षिण कोरियाचा कॉस्पी व जपानचा  निक्की हे तेजीत राहिले तर युरोपातील प्रमुख बाजार दुपारी तेजीत होते.

आयएचएस मार्केट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्सचा निर्देशांक (पीएमआय)ऑक्टोबर महिन्यात 55.9 वधारुन नोव्हेंबरमध्ये 57.6 वर राहिला आहे. या क्षेत्रातील स्थितीत 10 महिन्यांमध्ये सर्वात मजबूत सुधारणात्मक संकेत राहिले आहेत. दुसऱया बाजूला आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 3.96 टक्क्यांनी वधारुन 71.97 डॉलर प्रति बॅरेलवर राहिला आहे.

Related Stories

जर्मन ब्रँड वोन वेल्स भारतात येणार

Patil_p

जनतेला भागिदारी देण्यासाठी एलआयसी कायद्यात बदल होणार

Omkar B

वर्क फ्रॉम होम मोहिमेतून होतेय बचत

Patil_p

सलग तिसऱया सत्रात घसरण कायम !

Amit Kulkarni

‘ट्विटर’ टिकटॉकप्रमाणे प्लॅटफॉर्म तयार करण्याचे संकेत

Patil_p

कोळसा उत्पादन घटले

Patil_p
error: Content is protected !!