तरुण भारत

एकटाच पकडतो मगर

चित्रफिती अत्यंत घाबरविणाऱया

मगरींसमोर कुणाचा निभाव लागतो, विशेषकरून माणसाची स्थिती त्याचा जबडा बघूनच खस्ता होते. परंतु मॅट राइट नावाचा व्यक्ती या धोकादायक प्राण्याला एकटय़ानेच पकडण्यात तरबेज आहे. कुणाचीच मदत न घेता मगरीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही.

Advertisements

मगर आणि सुसरींना पकडण्यास मॅट तरबेज आहे. मॅट स्वतःच्या चित्रफिती आणि छायाचित्रे इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतो. तसेच वन्यप्राण्यांपासून अंतर राखा, जेणेकरून माणूस तसेच प्राण्यांना नुकसान होणार नाही असे आवाहन तो लोकांना करतो.

मॅट मगर पकडतानाची छायाचित्रे लोक टिपत असतात. एवढेच नव्हे तर मॅटने अनेक मगरींना वाचविले आहे. मॅट एका छायाचित्रात मगरीसोबत पाण्यात उतरलेला दिसून येतो. त्याची छायाचित्रे आणि चित्रफिती पाहून मॅट या प्राण्यासोबत सहजपणे वावरत असल्याचे जाणवते.

मगरींसोबतच्या त्याच्या छायाचित्रांना आणि चित्रफितींना सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असतो. नागरी वस्तीनजीक मगरींचे अस्तित्व आढळून आल्यावर मॅटलाच पाचारण करण्यात येते. मॅट देखील अत्यंत सहजपणे आणि कुणालाच नुकसान न पोहोचविता मगरींना तेथून हलवितो.

Related Stories

जगभरातील कोरोनामुक्ती 15 कोटींपार

datta jadhav

फ्रान्सने लॉकडाऊनचे निर्बंध हटवले

datta jadhav

अमेरिकेत ऑक्सफर्डच्या लसीची मानवी चाचणी थांबवली

datta jadhav

ब्राझील : संकट तीव्रच

Patil_p

किम जोंग उन कोमात, बहिणीकडे सत्तासूत्रे

Patil_p

तालिबानला मान्यता नाहीच…

datta jadhav
error: Content is protected !!