तरुण भारत

वायरलेस चार्ज होणार इलेक्ट्रिक वाहन

अमेरिकेत रस्त्याला चार्जरमध्ये रुपांतरित करण्याचा प्रयोग

ईव्हीशी निगडित चार्जिंगची समस्या संपुष्टात येणार

Advertisements

सध्या इलेक्ट्रिक कार्स अत्यंत चर्चेतआहेत. पण यंदा इलेक्ट्रिक वाहनांची विक्री कार्सच्या एकूण विक्रीच्या 4 टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे. यामागे सर्वात मोठे कारण दीर्घ प्रवासादरम्यान सहजपणे रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध नसणे हे आहे. ईव्हीची रेंज, चार्जिंगसाठीचा वेळ आणि चार्जिंग स्टेशनची उपलब्धता  या गोष्टी सध्या तरी आवाक्याच्या बाहेर आहेत.

चार्जिंगमध्ये लागणारा वेळ देखील एक मोठी समस्या आहे. या समस्येवरील निदानासाठी अशाप्रकारचे रस्ते तयार केले जात आहेत, जे कार धावल्यावर तिला चार्जही करू शकतील. याकरता इंडटिक्टव्ह चार्जिंग नावाचे तंत्रज्ञान विकसित केले जातेय. यंदा जुलैमध्ये इंडियानाचा परिवहन विभाग आणि परडय़ू युनिव्हर्सिटीने जगातील पहिला वायरलेस चार्जिंग काँक्रिट हायवेची योजना आखली आहे.

या प्रकल्पावर एस्पायर नावाचे इंजिनियरिंग रिसर्च सेंटर काम करत आहे. याला नॅशनल सायन्स  फौंडेशनकडून अर्थसहाय्य प्राप्त होत आहे. इलेक्ट्रिक वाहनांना रस्त्यांवर धावतानाच चार्ज करणे हा आमचा उद्देश आहे. याकरता चुंबकीय काँक्रिट तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून यात आयर्न ऑक्साइड, निकल आणि झिंक यासारखे धातू मिसळले जात आहेत. या काँक्रिटला मॅगमेंट या जर्मनी कंपनीने विकसित केल्याची माहिती एस्पायरच्या कँपस डायरेक्टर नाडिया यांनी दिली.

चुंबकीय क्षेत्र

काँक्रिट मिक्सचरमध्ये वीजेचा करंट प्रवाहित करून त्याला चुंबकीय स्वरुप देण्यात येते. यामुळे वायरलेस पद्धतीने वाहनाला ऊर्जा देत चार्ज करणारे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. पेटंट करविण्यात आलेल्या सामग्रीपासून निर्मित 12 फूट लांब 4 फूट रुंद प्लेट किंवा बॉक्सला रस्त्यावर काही इंच खाली दाबले जाते. या बॉक्सला पॉवरग्रिडशी जोडून यात वीज प्रवाहित केली जाते. हे ट्रान्समिट होते, जे रस्त्यावर धावणाऱया ईव्हीला ऊर्जा पुरविते. कारमध्ये बसविण्यात आलेल्या छोटय़ा बॉक्सद्वारे ही ऊर्जा प्राप्त केली जाते.

Related Stories

चीनचे प्रसिद्ध उद्योगपती जॅक मा दोन महिन्यांपासून बेपत्ता

datta jadhav

अध्यक्ष क्वारंटाइनमध्ये

Patil_p

स्पेनमध्ये 24 मेपर्यंत आणीबाणी

Patil_p

न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये गोळीबार

datta jadhav

न्यूयॉर्क : टाईम स्क्वेअरमध्ये भारतीय नागरिकांकडून चीनविरोधात निदर्शने

datta jadhav

चीनमध्ये कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचेही संकट?

prashant_c
error: Content is protected !!