तरुण भारत

मोहनलालचा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच सुपरहिट

‘मरक्कर’ची प्रदर्शनाआधी 100 कोटी क्लबमध्ये एंट्री

मल्याळम स्टार मोहनलाल यांचा चित्रपट ‘मरक्कर ः द लायन ऑफ द अरेबियन सी’ 2 डिसेंबर रोजी 16,000 शोसोबत मोठय़ा प्रमाणावर प्रदर्शित होणार आहे. स्वतःच्या प्रदर्शनाच्या एक दिवसपूर्वीच या चित्रपटाने 100 कोटी रुपये कमाविले आहेत. या चित्रपटाने प्रारंभिक बुकिंग्सच्या माध्यमातून पूर्वीच 100 कोटी रुपये कमाविले असल्याची माहिती मोहनलाल यांनी सोशल मीडियाद्वारे स्वतःच्या चाहत्यांना दिली आहे.

Advertisements

तसेच मोहनलाल यांनी स्वतःच्या पोस्टसोबत एक पोस्टरही शेअर केले आहे. मोहनलाल यांचा हा चित्रपट ऐतिहासिक युद्धपट आहे. एंटनी पेरुंबवूर यांच्याकडून निर्मित या चित्रपटात अर्जुन सरजा, सुनील शेट्टी, मंजूर वारियर आणि सिद्दीकी हे महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा चित्रपट मल्याळीसह तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषेतही झळकणार आहे. मोहनलाल हे मल्याळी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. राज्यासह देश तसेच विदेशातच त्यांचे चाहते मोठय़ा संख्येने आहेत.

Related Stories

कलाकारांनी मानले कोविड योद्धय़ांचे आभार

Patil_p

निर्जन बेटावर नारळानेच जगविले

Amit Kulkarni

24 डिसेंबरला प्रदर्शित होणार ‘अतरंगी रे’

Patil_p

‘भक्षक’मध्ये पत्रकाराच्या व्यक्तिरेखेत भूमी

Patil_p

हवेत उडणारी कार

Amit Kulkarni

80 वर्षांच्या आजोबांची भूमिका साकारणं आव्हानात्मक : दिलीप प्रभावळकर

Patil_p
error: Content is protected !!