तरुण भारत

पंजाबमध्ये आरडीएक्स हस्तगत, एकाला अटक

आयएसआयने रचला होता स्फोटांचा कट

वृत्तसंस्था/ चंदीगड

Advertisements

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याला हादरविण्यासाठी सीमेपलिकडून पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या तस्करांनी आरडीएक्स पाठविले होते.  याप्रकरणी पंजाब पोलिसांनी सुखविंदर सिंह नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. आरडीएक्सची तस्करी करणारे दोन्ही आरोपी सुखविंदरसोबत होते असे सांगण्यात आले.

22 नोव्हेंबर रोजी पठाणकोट सैन्यतळावर ग्रेनेडने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सामील दोन जणांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच दोघांनी आरडीएक्स आणल्याचा संशय आहे.

सीमेला लागून असलेल्या दीनानगर भागात आरडीएक्स, हँडग्रेनेड तस्करांद्वारे मागील महिन्यात पाठविण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तस्करांकडून पाठविण्यात आलेली स्फोटके आता कुठे आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.

खलिस्तानी दहशतवादी संघटना आणि आयएसआयने पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वी  मोठा हल्ला घडवून आणण्याचा कट रचल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत आरडीएक्स आणि हँडग्रेनेड हस्तगत करणे सुरक्षा दलांची मोठी कामगिरी आहे.

Related Stories

बेंगळुरात पंचमसाली समाजाचा एल्गार

Patil_p

भाजप सोडण्याच्या चर्चेवर ‘माननीयां’चा बेक

Patil_p

5 व्या टप्प्यात 79 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

Patil_p

शरद पवार यांना डिस्चार्ज

Patil_p

सुरक्षेत भर : 51 के-9 वज्र तोफांचा समावेश

Patil_p

इंदोर पुन्हा ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर

Patil_p
error: Content is protected !!