तरुण भारत

कमर्शियल सिंलिडर 100 रुपयांनी महाग

रेस्टॉरंटमध्ये खाणे महागण्याची शक्यता

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी कमर्शियल सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ केली आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या या निर्णयानंतर दिल्लीत 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत 2101 रुपये झाली आहे. मागील महिन्यात ही किंमत 2000 रुपये इतकी होती.

 तर घरगुती वापराच्या 14.2 किलोग्रॅमच्या गॅस सिलिंडरच्या दरात कुठलीच वाढ झालेली नाही. घरगुती ग्राहकांना आता अनुदानाची रक्कम मिळणे सुरू झाल्याचे समजते. अनुदान मिळू लागल्यास सर्वसामान्यांना आर्थिक आघाडीवर मोठी मदत होऊ शकते.

 कमर्शियल सिलिंडर महागल्याने रेस्टॉरंट आणि बाहेर खाणे महाग होऊ शकते. कमर्शियल सिलिंडर महाग झाल्याने रेस्टॉरंटमालकांचा खर्च वाढणार असल्याने याचा भार ते ग्राहकांवर टाकू शकतात. 

पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेत मोदी सरकारने अलीकडेच सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. गॅस सिलिंडरप्रकरणी देखील सरकारने दिलासा द्यावा अशी मागणी आता होऊ लागली आहे. 5 राज्यांमध्ये होऊ घातलेली विधानसभा निवडणूक पाहता सरकार दिलासा देणार असल्याचे मानले जात असतानाच कंपन्यांनी कमर्शियल सिलिंडरचे दर वाढविले आहेत.

कमर्शियल सिंलिडरचे दर सातत्याने वाढत आहेत. मागील महिन्यात देखील याच्या किमतीत 266 रुपयांची वाढ करण्यात आली होती. घरगुती एलपीजी सिंलिंडर खर्चापेक्षा कमी किमतीवर विकल्याने कंपन्यांना होणारे नुकसान आता (अंडर रिकव्हरी) 100 रुपये प्रति सिलिंडरपेक्षा अधिक झाल्याचे मागील महिन्यात समोर आले होते.

Related Stories

देशात रेकॉर्ड ब्रेक जीएसटीचा परतावा : निर्मला सीतारामन

Rohan_P

लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 40 प्रवासी जखमी

prashant_c

आनंदवार्ता : कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना तातडीच्या वापरासाठी मिळाली परवानगी

Abhijeet Shinde

भारतात मागील 24 तासात 22,771 नवे कोरोना रुग्ण, 442 मृत्यू

datta jadhav

नेमबाजीत मनीषला ‘सुवर्ण’; तर सिंघराजची ‘रौप्य’पदकाची कमाई

datta jadhav

एस टी कर्मचारी कामावर आल्यावर कारवाई नाही – अनिल परब

Sumit Tambekar
error: Content is protected !!