तरुण भारत

आंतरराष्ट्रीय विमानसेवेवरील निर्बंध लांबणार

15 डिसेंबरचा निर्णय अनिश्चित  काळासाठी पुढे ढकलला 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

या महिन्याच्या 15 पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवांवरील बंदी उठविण्याचा घेण्यात आलेला निर्णय अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे या विमानसेवांवरील निर्बंध लांबणार आहे. कोरोनाचे नवे रुप ओमिक्रॉनच्या चिंतेपोटी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अंशतः ही सेवा सुरु आहे.

ही घोषणा नागरी विमान वाहतूक विभागाच्या महासंचालकांकडून (डीजीसीए) करण्यात आली. ओमिक्रॉनचा प्रसार जगभरात वाढत आहे. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरु करण्याचा धोका पत्करता येत नाही. नागरी विमान वाहतूक प्राधिकरण या संदर्भात सर्व संबंधित विभागांशी आणि व्यक्तींशी चर्चा करीत आहे. सातत्याने माहिती मिळविली जात आहे. मात्र, परिस्थिती पुरेशी सुधारल्यानंतरच विमानसेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. विमानसेवा प्रारंभ करण्याची वेळ नंतर स्पष्ट करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे 15 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. विदेशी विमान प्रवाशांसंबंधीचे कठोर नियमही नुकतेच लागू करण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी चाचणी आणि विलगीकरण अनिवार्य आहे.

भारतीयांची धांदल

विदेशात गेलेल्या भारतीयांची मायदेशी परतण्यासाठी गडबड सुरु आहे. विशेषतः आफ्रिकेत पर्यटन किंवा व्यवसायासाठी गेलेल्यांनी परतण्याची घाई सुरु केली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि तर देशांच्या विमानळांवर लांब रांगा लागल्या आहेत. 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर पडल्याचे कळल्यानंतर या नागरीकांची चिंता वाढली आहे.

धोक्याच्या छायेतील देशांसंबंधी…

ओमिक्रॉन विषाणूचे उमगस्थान असलेला दक्षिण आफ्रिका आणि या विषाणूचा वेगाने प्रसार होत असलेले इतर देश हे ‘धोक्याच्या छायेतील’ (ऍट रिस्क) देश म्हणून ओळखले जात आहेत. या देशांमधील प्रवाशांसंबंधी किंवा त्या देशात गेलेल्या इतर देशांमधील प्रवाशांसाठी भारतात अधिक कठोर नियम करण्यात आले असून त्यांना चाचणी नकारात्मक आली तरी विलगीकरण अनिवार्य आहे.

Related Stories

दहशतवाद्यांचा नायनाट सुरूच

Patil_p

पर्युषण काळात मुंबईतील तीन जैन मंदिरे उघडणार

Patil_p

सराव शिबिरासाठी 24 जणांचा संघ जाहीर

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 608 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

CBSE बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा लांबणीवर

Rohan_P

व्यसन सोडविणारा ‘मॉलेक्युलर स्विच’

Patil_p
error: Content is protected !!