तरुण भारत

आमदाराच्या हत्येच्या कटाचा व्हिडिओ व्हायरल

काँग्रेस नेते गोपालकृष्ण यांच्यावर आरोप

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisements

बेंगळूरच्या यलहंका मतदारसंघाचे भाजप आमदार एस. आर. विश्वनाथ यांच्या हत्येच्या कटाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कोटय़वधी रुपयांची सुपारी देऊन विश्वनाथ यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप काँग्रेस नेते एम. एन. गोपालकृष्ण यांच्यावर झाल्याने खळबळ उडाली आहे. सीसीबी पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. या प्रकरणामध्ये देवराज उर्फ कुळ्ळ देवराज नामक व्यक्तीचे नावही पुढे आल्याने हे प्रकरण वेगळेच वळण घेण्याची शक्यता आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ मागील पाच महिन्यांपूर्वी गुप्तपणे चित्रित करण्यात आल्याचे समजते. यलहंका मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत गोपालकृष्ण यांना एस. आर. विश्वनाथ यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. आता हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून विश्वनाथ यांनी गोपालकृष्ण यांच्याविरोधात बुधवारी बेंगळूरच्या राजानुकुंटे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये कुळ्ळ देवराज या नावाचाही उल्लेख आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते एम. एन. गोपालकृष्ण हे देवराज नामक व्यक्तीशी संभाषण करीत असल्याचे दिसून येते. त्यामध्ये भाजप आमदार एस. आर. विश्वनाथ यांच्या हत्येसंबंधीच्या कटाची चर्चा झाल्याचे दिसून येते. मात्र, गोपालकृष्ण यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली असून आमदार विश्वनाथ यांना सुरक्षा पुरविण्याची सूचना पोलीस महासंचालक प्रवीण सूद आणि बेंगळूर पोलीस आयुक्त कमल पंत यांना दिल्याचे समजते.

हत्येची धमकी दिल्याचा व्हिडिओ सीसीबी पोलिसांच्या हाती लागला आहे. याच्या आधारे मंगळवारी रात्री पोलिसांनी काँग्रेस नेते गोपालकृष्ण यांची चौकशी केली आहे. चित्रिकरण केलेल्या कुळ्ळ देवराज याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केल्याचे समजते. देवराज हा विश्वनाथ यांचा समर्थक मानला जातो. त्यानेच गोपालकृष्ण यांच्याजवळ जाऊन आमदार विश्वनाथ यांना संपविण्याच्या कटाबाबत चर्चा घडविल्याची चर्चाही सुरू आहे. गोपालकृष्ण यांना अडचणीत आणण्यासाठी हे षड्यंत्र रचण्यात आले का?, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील क्लिष्टता आणखी वाढली आहे.

कटाबाबत सत्यासत्यता बाहेर यावी

गोपालकृष्ण यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना विश्वनाथ यांनी, आपण गृहमंत्र्यांकडेही तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली आहे. खुनाच्या कटाबाबत सत्यासत्यता बाहेर आली पाहिजे. गोपालकृष्ण आपले विरोधक नाहीत. तरी देखील त्यांनी आपल्याविरोधात कट का रचला याविषयी समजलेले नाही. अशा द्वेषाचे राजकारण आपण कधीही केलेले नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

व्हिडिओमधील 80 टक्के भाग खोटा

आपण कोणत्याही कारणास्तव भाजप आमदार एस. आर. विश्वनाथ यांच्या खुनाचा कट रचला नाही. आपण कोणत्याही गुंडांशी संपर्क साधलेला नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील 80 टक्के भाग खोटा आहे. काही भाग खरा असू शकतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते गोपालकृष्ण यांनी दिली आहे.

चूक केलेल्यांना शिक्षा करता येईल – शिवकुमार

भाजप आमदार एस. आर. विश्वनाथ यांच्या हत्येची सुपारी काँग्रेस नेते गोपालकृष्ण यांनी दिल्याचा कथित व्हिडीओ उघड झाल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी चूक केली त्यांना शिक्षा करता येईल. राजकारणात अशा गोष्टी होतच असतात. सर्व गुंड विश्वनाथ यांच्या बाजूने आहेत. त्यांची यादी हवी असेल तर देईन. गोपालकृष्ण यांच्याशीही आपण चर्चा केली आहे. त्यांनी आपल्याजवळ कोणतीही चूक केली नसल्याचे सांगितले आहे. आपण चित्रफीत बघितलेली नाही. व्हिडीओ क्लिप पाहून याविषयावर अधिक प्रतिक्रिया देईन, असे शिवकुमार यांनी सांगितले.

Related Stories

ड्रोन वापराबाबत मार्गदर्शक तत्वे जारी

datta jadhav

कोरोनाबाधित मुलांना रेमडेसिवीर,स्टेरॉइड नको; केंद्राकडून नव्या गाईडलाईन जारी

Rohan_P

जेएनयू : तपास आव्हानात्मक

Patil_p

महाराष्ट्रातील मद्यविक्री परवाना शुल्कात सूट

Omkar B

पंजाबमध्ये गेल्या 24 तासात 857 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

खेलरत्न पुरस्कारासाठी ‘या’ दोन खेळाडूंची बीसीसीआयकडून शिफारस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!