तरुण भारत

उत्तर कर्नाटकात थंडीचा कडाका

हवामान विभागाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर

पुणे / प्रतिनिधी

Advertisements

 डिसेंबर ते फेब्रुवारी या थंडीच्या कालावधीत मराठवाडा, विदर्भ, उत्तर कर्नाटकचा काही भाग, तेलंगणाचा काही भाग, हिमालयाच्या भागात किमान तापमान हे सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने बुधवारी वर्तविला आहे. यामुळे मराठवाडा, विदर्भ हे यंदाच्या हंगामात चांगलेच गारठणार आहेत. याशिवाय देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान हे सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

 भारतीय हवामान विभागाने बुधवारी थंडीच्या मोसमाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार मध्य प्रदेश, पश्चिम राजस्थानचा काही भाग, हिमालयाचा काही भाग, विदर्भ, मराठवाडा, उत्तर कर्नाटकाचा बहुतांश भाग, तेलंगणाच्या काही भागात थंडीची तीव्रता जास्त असेल. याशिवाय गोवा, कर्नाटकचा उर्वरित भाग, केरळ, आंध्रचा बहुतांश भागात किमान तापमान सरासरीइतके असेल. पूर्वोत्तर भारत, ओरिसा, उत्तर आंध्र, हिमालयाच्या पायथ्याखालील भागात किमान तापमान सरासीपेक्षा अधिक राहील.

 कमाल तापमान सरासरीपेक्षा कमीच

 वायव्य भारताचा काही भाग, हिमालयाचा बहुतांश भाग तसेच पूर्वोत्तर भागात कमाल तापमान सरासरीहून अधिक राहणार आहे. हा भाग वगळता कमाल तापमान सर्व भारतात सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. एकूणच पूर्वोत्तर भागात थंडीचा कडाका यंदा कमी राहण्याची चिन्हे आहेत.

 ला निनो उद्धभवणार

 दरम्यान, सध्या ला निनोची प्रशांत महासागरातील सध्याची स्थिती कमकुवत आहे. मात्र, या थंडीच्या मोसमात त्याला बळकटी मिळणार असून, तो बळकावण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

 डिसेंबर महिन्यात दक्षिणेत अधिक पाऊस

 दरम्यान, ईशान्य मोसमी पावसाचा तडाखा दक्षिण भारताला बसत असून, डिसेंबरही महिन्यातही सरासरीच्या 132 टक्के अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Related Stories

देशात 21 हजार 822 नव्या बाधितांची नोंद

Patil_p

मासे सांगणार नदी प्रदूषणाची पातळी

Patil_p

पंजाब : मागील 24 तासात 3,329 नवे रुग्ण, 63 मृत्यू

Rohan_P

”उत्तरप्रदेश विधानसभा : काँग्रेस सत्तेत आल्यास १० लाखांपर्यंत मोफत उपचार,आणि बरंच काही…”

Abhijeet Shinde

कल्याण सिंहांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Patil_p

बिहार : लग्नानंतर दोन दिवसातच वराचा मृत्य; लग्नातील 95 पाहुणे कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P
error: Content is protected !!