तरुण भारत

अखेर तिन्ही कृषी कायदे रद्द

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून शिक्कामोर्तब

@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

कृषी कायदे माघारी विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वतःचे शिक्कामोर्तब केले आहे. याचबरोबर तिन्ही कृषी कायदे आता रद्दबातल  ठरले आहेत. यापूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी संसदेतील दोन्ही सभागृहांमध्ये तिन्ही कृषी कायद्यांच्या माघारीचे विधेयक संमत झाले होते. या कायद्यांच्या विरोधात मागील एक वर्षापासून शेतकऱयांनी आंदोलन सुरू आहे.

सोमवारी लोकसभेत कृषी कायदे माघारी विधेयक संमत झाले, त्यानंतर राज्यसभेतही ते संमत करविण्यात आले. तर सिंघू सीमेवर बुधवारी होणार शेतकऱयांच्या 40 संघटनांची बैठक रद्द करण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या अनेक संघटनांनी या बैठकीपासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला. संयुक्त किसान मोर्चाची बैठक 4 डिसेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत आंदोलन संपुष्टात आणावे की नाही यावर निर्णय होणार आहे.

कृषी कायदे रद्द करण्यात आल्यावर दिल्ली सीमेवर सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यासंबंधी शेतकरी संघटनांमधील मतभेद आता ठळकपणे समोर आले आहेत. शेतकऱयांचा एक गट आंदोलन मागे घेण्याच्या मताचा आहे. तर दुसरा गट सरकारने एमएपीची हमी द्यावी अशी मागणी करत आहे.t

Related Stories

उमर खालिदला 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

Rohan_P

चुरशीच्या संग्रामात रालोआला आघाडी

Patil_p

देशात मृत-बाधितांमध्ये वाढीचा सपाटा कायम

Patil_p

ओडिशात आज धडकणार ‘यास’

Patil_p

सुरतमध्ये म्यूकोरमाइकोसिसमुळे 8 रुग्णांनी गमावली दृष्टी

datta jadhav

मेहबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ

Rohan_P
error: Content is protected !!