तरुण भारत

डेव्हिस चषक : जर्मनी उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ इन्सब्रुक, ऑस्ट्रिया

येथे झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत जर्मनीने ब्रिटनचा पराभव करून डेव्हिस चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले.

Advertisements

1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर दुहेरीच्या लढतीला निर्णायक स्वरूप प्राप्त झाले होते. केव्हिन क्रॅवीट्झ व टिम प्युट्झ यांनी अतिशय चुरशीच्या झालेल्या दुहेरीत ब्रिटनच्या जो सॅलिसबरी व नील स्कुपस्की यांचा पराभव करून आपल्या संघाला शेवटच्या चारमध्ये स्थान मिळवून दिले. या सामन्यातील दोन्ही सेट्स टायब्रेकरपर्यंत लांबले होते. पहिल्या सेटमध्ये चार सेट पॉईंट्स वाचवत जर्मनीच्या जोडीने विजय मिळविला. ब्रिटनच्या जोडीने दुसऱया सेटमधील टायब्रेकरमध्ये 5-0 अशी आघाडी घेतली तेव्हा ते तिसऱया सेटपर्यंत सामना लांबवणार असेच वाटत होते. पण जर्मनीच्या जोडीने शेवटचे सात गुण जिंकत विजय मिळविला. शनिवारी त्यांची लढत स्वीडन किंवा रशिया यापैकी एकाशी होईल.

Related Stories

नदालचा गोल्फ स्पर्धेत सहभाग

Patil_p

ऍन्सी सोजनला दोन सुवर्णपदके

Patil_p

ऑस्ट्रेलियन फुटबॉलपटूला कोरोनाची बाधा

Patil_p

आय लीग स्पर्धेतील उर्वरित सामने रद्द?

Patil_p

महिला निवड समिती अध्यक्षपदी नीतू डेव्हिड यांची नियुक्ती

Patil_p

सुपरनोव्हाज-ट्रेलब्लेझर्स आज जेतेपदाची लढत

Patil_p
error: Content is protected !!