तरुण भारत

शेरेचीवाडी येथील युवकाचा सालपे येथे खून

वार्ताहर/   लोणंद

सालपे (ता. फलटण) गावच्या हद्दीत बापु संभाजी निकम (वय 38  रा. शेरेची वाडी ता. फलटण) याचा दोघा भावांनी अज्ञात कारणावरून लाकडी दांडक्याने डोक्यात, कपाळावर, हातावर मारहाण करुन खून केला आहे. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. या घटनेने सालपे परिसरात  खळबळ उडाली आहे.

Advertisements

याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी चार वाजण्याच्या सुमारास सालपे गावच्या हद्दीत बसस्टॉपजवळ लोणंद ते सातारा जाणाऱया रोडवर पिंपळाच्या झाडाजवळ बापु संभाजी निकम यास गौरव संजय जगताप व त्याचा भाऊ सौरव संजय जगताप दोघे (रा. सालपे) यांनी कोणत्या तरी अज्ञात कारणावरुन लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून केला आहे. या घटनेची फिर्याद शामराव कोंडिबा कणसे यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली असून पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही संशयित आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

या घटनेचा अधिक तपास लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे करीत आहेत. घटनास्थाळी फलटणचे उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी भेट दिली आहे. बापु निकम याचा मृतदेह लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून या घटनेने सालपे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बापु निकमचे लग्नग्न झाले नसून तो मोलमजुरीचे काम करत होता.

Related Stories

जावलीत कोरोनाचा विळखा सुटता सुटेना ..!

Patil_p

राजधानीत झाली शिवमय

Patil_p

महामार्ग ओलांडणाऱया बिबटय़ाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

Patil_p

‘स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी’ तांबवे सुन्न!

Omkar B

कोल्हापूर जिल्ह्यात आज 8 पॉझिटिव्ह; कोरोना बाधितांची संख्या 655 वर

Abhijeet Shinde

दिव्यांग संघटना पालिकेसमोर करणार आंदोलन

datta jadhav
error: Content is protected !!