तरुण भारत

कार व ट्रकच्या भीषण अपघातात दोघे ठार

प्रतिनिधी/ दहिवडी

मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दहिवडी जवळ झालेल्या स्विफ्ट कार व ट्रकच्या भीषण अपघातात दहिवडीतील दोघे जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला.

Advertisements

याबाबतची माहिती अशी, दहिवडीतील पियुष शैलेंद्र खरात (वय ः 22 वर्ष),  स्वयंम सुशिल खरात (वय ः16 वर्ष) व अक्षय दिपक खरात हे तिघेजण रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारमधून फलटण बाजूकडून दहिवडीला येत होते. तर त्याचवेळी एक ट्रक दहिवडी बाजूकडून फलटणच्या दिशेने चालला होता. दहिवडी – फलटण रस्त्यावरील हिंदुस्थान पेट्रोलियम पंपासमोरील वळणावर या दोन्ही गाडय़ांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात पियुष व स्वंयम हे जागीच ठार झाले तर अक्षय गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की स्विप्टकारचा चक्काचूर झाला आहे. रस्त्यावर गाडीच्या काचा, पत्रे फायबर पार्ट गळून पडले होते. मृत झालेले पियुष व स्वंयम गाडीच्या समोरील काचेतून बाहेर फेकले गेले होते तर निम्मे शरीर गाडीच्या स्टेरींग व इंजिनची दामटी होऊनमध्ये अडकले होते. गाडीच्या दोन्ही ही एअरबॅग ओपन होऊन सुध्दा त्यांचे प्राण वाचले नाहीत. ट्रकची आणि कारची धडक इतकी भिषण होती की धडकेत दहा चाकी मालाने भरलेला ट्रक सुध्दा पलटी झाला होता. ही घटना रात्री दीडच्या सुमारास घडली. ट्रकमध्ये ड्रायव्हरसह दोन क्लीनर होते. हे तिघे किरकोळ जखमी झाले होते. त्यातील ड्रायव्हर पळून गेला तर दोघे क्लिनर जमावाकडून मार मिळेल या भितीने लगतच्या शेतात लपून बसले होते. दहिवडी पोलिसांना अपघाताची खबर मिळताच सपोनि संतोष तासगावकर व नाईट डय़ुटीला असणारे सर्व पोलीस कर्मचारी घटनास्थळी तत्काळ हजर झाले. कारमध्ये अडकलेल्यांना तेथे जमलेल्या लोकांच्या मदतीने बाहेर काढले व सर्व जखमींना शेखरभाऊ गोरे यांच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय दहिवडी येथे आणले. डॉक्टरांनी तिघांनाही तपासले असता पियुष व स्वयंम यांना मृत घोषित केले तर गंभीर जखमी असणाच्या अक्षय खरात यास अधिक उपचारासाठी सातारा येथील सिव्हील हॉस्पीटल येथे पाठवण्यात आले. याबाबतची फिर्याद मृत पियूषचे वडील शैलेंद्र खरात यांनी दहिवडी पोलीसात दिली आहे. अधिक तपास पोलीस उपानिरीक्षक दयानंद तुपे करीत आहेत.

Related Stories

कोल्हापूर : भेंडे गल्लीत जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई, ४६ हजाराचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Shinde

ओबीसी आरक्षण अडकलं हे भाजपचंच पाप – विजय वडेट्टीवार

Abhijeet Shinde

भुईंज ग्रामपंचायतीची जागा विकून लाखोंचा अपहार

Patil_p

शाहूनगरी झाली भीममय

Omkar B

दिवाळीनंतर 3 मंत्री आणि त्यांच्या जावयांचे फटाके फोडणार

datta jadhav

सुरभीने बनविले मेंदूवरील उपचारासाठी मायक्रो चिप

Abhijeet Shinde
error: Content is protected !!