तरुण भारत

कांदा बटाटा व्यापारी दरीत पडला की ढकलला?

वार्ताहर/ परळी

साताऱयाच्या मार्केट यार्डमध्ये कांदा बटाटय़ाचा व्यापार करणारा व्यापारी सुशांत श्यामराव बोराटे (वय 38, रा. करंजे पेठ, सातारा) हा मंगळवारी रात्री मित्रासमवेत यवतेश्वर परिसरात ओली पार्टीला गेला. पार्टी केली अन् सकाळी काही जणांना यवतेश्वरच्या दरीत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांना माहिती दिली. सातारा तालुका पोलीस अन् शिवेंद्रराजे रेस्कू टीमने अथक परिश्रम घेवुन त्यास 200 फुट खोल दरीतून जिवंत बाहेर काढण्यात यश आले. मात्र, तो स्वतः दरीत पडला की त्याला त्याच्या मित्रांनी दरीत ढकलून दिले याचा शोध पोलीस घेत आहेत. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements

सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फोनवरुन यवतेश्वरच्या दरीत एकजण जखमी अवस्थेत पडल्याबाबतचा निनावी फोन आला. फोनची माहितीवरुन सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक देव, पो. ना. पाटोळे, हवालदार महांगडे, जीप चालक मोरे हे घटनास्थळी पोहचले. तर दरीत युवक दिसत असल्याने त्यापर्यंत पोहचून त्याला बाहेर काढणे गरजेचे होते. त्यामुळे शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला बोलवण्यात आले. रेस्क्यू टीमचे पथकाचे जवान त्याच्यावळ पोहचले तर जखमी झालेला युवक वेदनेने तडफडत होता. त्याला जिवंत पाहून मदतकार्य वेगाने सुरु करुन त्याला दरीतून दुपारी बाहेर काढण्यात यश आले. त्याचा डावा पाय मोडला असून त्यास लगेच त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सुशांत बोराटे हा जखमी अवस्थेत यवतेश्वरच्या दरीत आढळून आला तेव्हा तो वेदनेने कण्हत होता. तो रात्रभर रिमझिम पावसात थंडीत अडकल्याने त्यांच्या अंगावर फाटलेली भिजलेली कपडे काढून त्याच्या अंगावर उबदार कपडे देताच तो काहीसा बोलू लागला. तेव्हा त्यांने जी माहिती दिली ती खूपच भयंकर होती. आम्ही मित्रमित्र पार्टी करायला आलो. पार्टी केली, जेवलो. आमच्यामध्ये वाद झाला. अन् त्यातील काहींनी ढकलून दिले असे तो सांगतो आहे. तर त्याची दुचाकी ही काही अंतरावर मिळून आली. त्यामुळे तो स्वतः दारु पिऊन पडला की त्याला त्याच्या मित्रांनी ढकलून दिले याचा शोध पोलीस घेत आहेत. तुम्ही मला दुसरा जन्म दिला आहे, मला वाचवा, असे म्हणत होता.

Related Stories

सलग दुसऱया वर्षी देखावे नाहीत

Patil_p

पुसेगावात 65 हजारांचा गुटखा जप्त; 2 जण ताब्यात

datta jadhav

जिल्हा परिषद प्रत्येक तालुक्याला बी – बियाणे खरेदीसाठी देणार 6 लाखांचे अनुदान

Abhijeet Shinde

इंधन दरवाढीच्या नावाखाली 23 लाख कोटींची वसुली

Patil_p

RT-PCR चाचणीचे अहवाल उशीरा, रुग्णांना चिंता

datta jadhav

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे –

Patil_p
error: Content is protected !!