तरुण भारत

शाळेची घंटा खणाणली

प्रतिनिधी/ सातारा

कोरोनामुळे तब्बल अठरा महिने जिह्यातील शाळा बंद होत्या. राज्य शासनाच्या निर्णयामुळे बुधवारी शाळेतील पहिला दिवस ठरला. जिह्यातील शाळेमध्ये आज सकाळीच शाळेची घंटा खणाणली. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचीही घाई दिसत होती. शाळा कशी आहे हे दोन वर्ष विद्यार्थी विसरुनच गेले होते. शाळा म्हणजे मोबाईल हेच समिकरण बनले होते. प्रत्यक्षातली शाळा आज पहाताना विद्यार्थ्यांचे मन हरकून गेले. पालकही आर्वजून सोडायला शाळेत गेले होते.

Advertisements

शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी प्रत्येक गटशिक्षणाटाधिकाऱयांकरवी प्राथमिक शाळेच्या मुख्याद्यापकांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शाळाशाळांमध्ये तयारी केली होती. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पताका लावण्यात आल्या होत्या. फुगे लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांची मिरवणूक बैलगाडीतून काढण्यात आली. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना ओवाळून त्यांना गुलाब फुल देवून स्वागत करण्यात आले. शाळांमध्ये तब्बल अठरा महिन्यानंतर शाळा सुरु झाल्या. त्यामुळे तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना तब्बल पहिलीत कोण कोण मित्र होते तेही आठवत नव्हते.

Related Stories

सैदापुरला स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर करा

Patil_p

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात 15,765 नवे रुग्ण; एकूण आकडा 8 लाख पार

Rohan_P

महाबळेश्वरला पावसाने हजारी ओलांडली

Patil_p

महामार्गावरील लोखंडी तारा जात आहेत चोरीला

datta jadhav

महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची याच्यात अडकले – बाबा आढाव

Abhijeet Shinde
error: Content is protected !!