तरुण भारत

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ.चोरगे तर उपाध्यक्षपदी बाबाजी जाधव

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा डॉ. तानाजी चोरगे यांची तर उपाध्यक्षपदी बाबाजी जाधव यांची एकमताने निवड झाली आहे. जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया बुधवारी सकाळी झाली. अध्यक्षपदी चोरगे यांना सूचक म्हणून जयंत जालगांवकर व अनुमोदक म्हणून सुधीर कालेकर तर उपाध्यक्षांना सूचक म्हणून शेखर निकम व अनुमोदक म्हणून संजय रेडीज होत़े

Advertisements

  तत्पूर्वी जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर चर्चा झाली. यावेळी अध्यक्षपदासाठी डॉ. तानाजी चोरगे तर उपाध्यक्षपदासाठी बाबाजी जाधव या नावांवर सर्व संचालकांचे एकमत झाले. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.   यानंतर पत्रकार परिषदेमध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष ड़ॉ तानाजी चोरगे म्हणाले की, गेल्या 15 वर्षामध्ये बँकेला राज्यासह देश पातळीवरील विविध पारितोषिक मिळाली आहेत़ यापुढे बँकेच्या 3 विभागामध्ये प्रत्येकी 1 एटीएम व्हॅन घेण्यात येणार आह़े मोबाईल बँकिगला परवानगी मिळाली असून लवकरच बँकेची मोबाईल बँकिग सेवाही सुरु होणार आह़े जिल्हा बँकेचे स्वतःचे सॉफ्टवेअरही तयार करण्यात येणार आह़े यासह जिल्हय़ातील 372 विविध सहकारी सोसायटीचे संगणकीकरण करण्यात येणार असल्याची माहीती चोरगे यांनी दिल़ी जिल्हय़ात नवीन योजना सुरु करण्यासाठी कोल्हापूरचे गोकुळ दूध संघ, कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक व रत्नागिरी जिल्हा सहकारी बँक एकत्र प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाल़े पूरग्रस्तांना 5 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करण्यात आल्याचा पुनरुच्चारही

Related Stories

अडकलेल्या दोन ट्रेकर्सची खेड पोलिसांकडून सुखरूप सुटका

Patil_p

आंबा वाहतुकीतील चालक ‘पॉझिटिव्ह’

NIKHIL_N

निवडणूक आयोगाची यावर्षी लोकशाही दीपावली स्पर्धा

Patil_p

‘पांढरी चिप्पी’ला ‘राज्य कांदळवन वृक्ष’ म्हणून घोषित

NIKHIL_N

पाडलोसमध्ये दोडकी शेतीचे नुकसान

NIKHIL_N

आमदार लाडकडून जिल्हा प्रशासनाला 10 लाखाचा निधी

NIKHIL_N
error: Content is protected !!