तरुण भारत

मडगावात शनिवारपासून ‘सरस’ मेळा

ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांची माहिती

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

ग्रामीण कारागिरांचा विकास आणि त्यांची उत्पादने यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेतफ् सरस मेळा (प्रदर्शन) आयोजित केला आहे. येत्या दि. 4 ते 14 डिसेंबर या कालावधीत मडगाव येथे सदर मेळा होणार आहे, अशी माहिती ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी पर्वरी येथे पत्रकार परिषदेत दिली.

विविध राज्यातील सुमारे 300 पेक्षा अधिक कारागीर त्यात सहभागी होणार आहेत. गोव्यातील हा सरस मेळा 11 वा असून गेल्यावर्षी  कोरोना महामारीमुळे  मेळा झाला नव्हता. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयातफ्xढ या ‘सरस’  मोळ्यासाठी रुपये 35 लाखाचे अर्थसहाय्य करण्यात आले असून राज्य सरकार  रुपये 9 लाख खर्च करणार आहे, असे मंत्री लोबो यांनी सांगितले.

आंध्रप्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तिसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मिर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश,  महाराष्ट्र, मणिपूर, नागालँड, ओडीसा, पाँ†िडचेरी, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, या राज्यातील कारागीर या मेळ्यात भाग घेऊन स्टॉल मांडणार आहेत, असे मंत्री लोबो यांनी सांगितले.

Related Stories

हस्तांदोलनावेळी लस घेतल्याची विचारपूस करा

Amit Kulkarni

शौचालय योजनेच्या कागदपत्र सोपस्कारासाठी 15 दिवसांचा अवधी द्यावा

Patil_p

सरकारला सामाजिक आरोग्यापेक्षा राजकीय आरोग्य जास्त महत्त्वाचे

tarunbharat

गावागावात लोकांचे स्वेच्छेने लॉकडाऊन

Omkar B

ही तर उदरनिर्वाहासाठी संघर्षाची लढाई

Patil_p

आयआयटी मेळावलीतच!

Omkar B
error: Content is protected !!