तरुण भारत

अश्विनकुमार उर्फ बाळासाहेब लकडे यांचे निधन

विटा/प्रतिनिधी

विट्याच्या आर्थिक, उद्योग, सामजिक, शैक्षणिक, राजकीय पटलावर आपल्या कतृत्वाने ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते अश्विनकुमार उर्फ बाळासाहेब रामचंद्र लकडे(७८) यांचे निधन झाले. कृषि उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, विटा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अशा विविध पदावर त्यांनी काम पाहिले. त्यांच्या निधनाने शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब लकडे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक होत. काका या नावाने ते परिचित होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी लकडे उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवली. अत्यंत कष्टातून त्यांनी लकडे उद्योग समूहाचा विस्तार केला. विटा वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष, शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी पाच वर्षे काम पाहिले. विटा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून काम करण्याचा बहुमान त्यांना मिळाला. अनेक सामाजिक संस्था आणि शासनाने आदर्श उद्योजक म्हणून त्यांचा गौरव केला. जिल्हाभरातील नव उद्योजकांना त्यांनी नेहमीच मार्गदर्शन केले.

लोकनेते राजारामबापू पाटील यांचे ते खंदे समर्थक होते. बापूंच्या पश्चात त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी सलोखा ठेवला. माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम, स्व. आर. आर. पाटील यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. आमदार अनिल बाबर यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. विट्याच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक प्रगतीत काकांनी बहुमोल योगदान दिले. अत्यंत स्पष्टवक्ते, तितकेच प्रेमळ, दिलदार आणि धाडशी व्यक्तिमत्त्व म्हणून काकांचा लौकिक होता.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, पाच मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Advertisements

Related Stories

जत तालुक्यातील दरीबडची येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात अतिरिक्त निर्बंध लागू

Sumit Tambekar

ज्यादा प्रवासी भरलेल्या आटपाडी-सांगली एसटीवर पोलिसांची कारवाई

Abhijeet Shinde

वाहनावरील ताबा सुटल्याने अपघातात चालक जागीच ठार

Sumit Tambekar

कुपवाडचा गुन्हेगार सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Abhijeet Shinde

सांगली : बहे परिसर कृष्णा नदीपात्रात मगरीचे दर्शन

Sumit Tambekar
error: Content is protected !!