तरुण भारत

मंत्र्याचे वासनाकांड भाजपाला भोवणार

आमदार कार्लुस आल्मेदा यांचा इशारा

प्रतिनिधी /वास्को

Advertisements

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी राज्य सरकारमधील एका मंत्र्यांवर केलेल्या वासनाकांडाच्या आरोपाला वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनीही पुष्टी दिलेली आहे. या प्रकरणाबाबत आपण यापूर्वीच भाजपाच्या नेत्यांशी बोललो होतो. या प्रकरणाचे गंभीर परीणाम पक्षाला भोगावे लागणार आहेत. त्या मंत्र्याला उमेदवारीपासून दूर न केल्यास हे प्रकरण गोव्यातच नव्हे तर पाचही राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला महागात पडेल असा ईशारा आमदार कार्लुस आल्मेदा यांनी दिला आहे. भाजपासाठी हा घरचा आहेर आहे.

आमदार कार्लुस आल्मेदा यांनी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी गोवा भाजपा सरकारमधील एका मंत्र्यांवर केलेल्या वासनाकांडाच्या आरोपांबाबत माध्यमांशी बोलताना या प्रकरणाबाबत आपल्यालाही बरीच माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.  अनेकांनी या प्रकरणाचे व्हिडियो पाहिलेले आहेत. हे प्रकरण आता जगजाहीर झालेले आहे. अजून चित्रपट यायचा आहे. त्यानंतरच या चित्रपटातील मुख्य नायक कोण याचा उलगडा जनतेला होणार आहे. मात्र, या प्रकरणाचा फार मोठा परीणाम भाजपावर निवडणुकीत होणार आहे. हा मंत्री वास्कोशी अगदी जवळीक असलेला मंत्री असून या प्रकरणाची होणारी चर्चा, फिरत असलेला व्हिडियो, होणारे आरोप आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण बऱयाच पूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनाही माहिती दिली होती. आता हे वासनाकांड जगजाहीर झालेले आहे. देशातील उत्तर प्रदेशसारख्या राज्यात असे प्रकार घडत असतात. मात्र, गोव्यात असे घडत नाहीत. मंत्र्यांचे हे वासनाकांड गोव्यासाठी गंभीर प्रकरण असून त्याच मंत्र्याला विधानसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी दिल्यास गोव्याच्या निवडणुकीतच नव्हे तर पाचही राज्यातील निवडणुकांत याचे गंभीर पडसाद उमटतील असा ईशारा आमदार कार्लुस आल्मेदा यांनी भाजपाला दिला आहे.

Related Stories

इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या कार्यकारी समिती सदस्यपदी किरण ठाकुर

Amit Kulkarni

अमेरिकेने ‘कोरोना’ धोका वेळीच ओळखला नाही

Omkar B

कोरोना सेवेसाठी कंत्राटीपद्धतीवर 75 कर्मचाऱयांची भरती

Omkar B

भाऊसाहेबांचे सूड, स्वार्थाचे नव्हे, परोपकाराचे राजकारण!

Amit Kulkarni

खनिजमालप्रकरणी निवाडय़ाचे श्रेय घेण्याचा भाजपकडून प्रयत्न

Patil_p

जांबावलीचा गुलालोत्सव साजरा न करण्याचा निर्णय

Amit Kulkarni
error: Content is protected !!