तरुण भारत

पोळे येथून सुटलेली चोरटी दारू माजाळी चेकनाक्यावर पकडली

1.72 लाख रु. किमतीची दारू, वाहन जप्त

प्रतिनिधी /काणकोण

Advertisements

गोव्यातून कारवारला बेकायदा दारू घेऊन जाणारे वाहन माजाळी चेकनाक्यावरील अबकारी खात्याच्या कर्मचाऱयांनी 1 डिसेंबर रोजी पहाटे पकडून सदर वाहनातील अंदाजे 1 लाख 72 हजार रु. किमतीची चोरटी दारू ताब्यात घेतली. विशेष म्हणजे सदर वाहन पोळे चेकनाक्यावरून सहिसलामत सोडण्यात आले होते.

माजाळी चेकनाक्यावरील अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर वाहनात  रिकाम्या पेटय़ा भरलेल्या होत्या आणि सदर पेटय़ांमध्ये 750 मिलीलिटरच्या 768 इतक्या बाटल्या भरलेल्या होत्या. त्या बाटल्या तसेच जे वाहन ताब्यात घेतले आहे सदर वाहनाची किंमत धरून एकूण 3 लाख 21 हजार  रु. किमतीचा ऐवज कर्नाटक अबकारी खात्याच्या ताब्यात सध्या आहे. माजाळी चेकनाक्यावर गोव्यातून प्रवेश करणाऱया वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून आतापर्यंत अशा प्रकारे पकडलेली 27 वाहने या चेकनाक्यावर धूळ खात पडलेली दिसत आहेत.

Related Stories

फोंडय़ात पन्नास कार्यकर्त्यांचा मगो प्रवेश

Patil_p

कळंगुटचे पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ निलंबित

Omkar B

मुरगाव तालुक्यात कडक लॉकडाऊनची मागणी वाढतेय

Amit Kulkarni

महापौरांकडून मार्केटची पाहणी

Amit Kulkarni

बार्देशात दत्तजयंती उत्साहात

Patil_p

बस्तोडा पंचायत क्षेत्रात विकास कामांना गती

Omkar B
error: Content is protected !!