तरुण भारत

आमोणे येथील शांतादुर्गा देवस्थानच्या जत्रोत्सवास प्रारंभ

वार्ताहर /आमोणे

आमोणे येथील श्री शांतादुर्गा देवस्थानच्या प्रसिद्ध जत्रोत्सवास 1 डिसेंबरपासून प्रारंभ झाला आहे. श्री पूर्वस बेताळ देवाचा दसरोत्सव व कौलोत्सव गुरुवार दि. 2 रोजी होणार आहे. पोविड 19 चे सर्व नियमांचे पालन करून तीन दिवस जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

Advertisements

जत्रोत्सवाच्या दुसऱया दिवशी म्हणजे आज गुरुवारी गावातील सुवासिनींकडून पारंपरिक पद्धतीने दिवजोत्सव होतो. ओवाळणी, ओटी भरणे कार्यक्रम आटोपल्यानंतर देवीची मिरवणुकीद्वारे श्री अमृतेश्वर मंदिरात कळस आणला जातो.. दुपारी श्री बेताळ मंदिरात प्रसिद्ध दसरोत्सरा प्रीत्यर्थ ‘खेत्र’ विधी व सायंकाळी मंदिराच्या प्रांगणात गाऱहाणे झाल्यावर सोने लुटण्यासाठी देव जातात, रात्री श्री बेताळ देवाचे तरंग श्री शांतादुर्गा देवीचा कळस महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात आल्यावर येथे मानाचे कौल व नंतर ऐच्छिक कौल होतो.

तिसऱया दिवशी म्हणजेचे 3 रोजी गावच्या सर्व सुहासिनींकडून श्री बेताळ देवाची ओवाळणी व नंतर श्री महालक्ष्मी रवळनाथ मंदिरात दिवजोत्सव होतो. सायंकाळी श्री महालक्ष्मी रवळनाथ मंदिरात पुराण वाचन प्रसाद वाटपाने जत्रोत्सवाची सांगता होईल.

श्री पूर्वस बेताळ मंदिरात कार्तिक कृ. पंचमीपासून नवरात्रोत्सव सुरू आहे. नवरात्रोत्सव पुराण वाचन झल्यावर भजन व तीर्थप्रसाद, मखरोत्सव सुरू होतो. त्याची सांगता बुधवारी झाली. गुरुवार दि. 2 रोजी श्री बेताळ देवाचा प्रसिद्ध दसरोत्सव होईल. सर्व भाविकांनी कोविड मार्गदर्शक तत्वांचे पालन करून आमोणे गावच्या जत्रोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

Related Stories

राजकीय पक्षांनी विशेष अधिकारी नेमावा

Amit Kulkarni

पेडणे पालिका नगराध्यक्षपदी उषा नागवेकर तर उपनगराध्यक्षपदी मनोज हरमलकर यांची बिनविरोध निवड

Amit Kulkarni

प्रबोधन प्राथमिक विभागाच्या इमारतीची 28 रोजी पायाभरणी

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावाच : आप

Amit Kulkarni

ज्ञानप्रसारक कॉलेजमध्ये पुस्तक प्रदर्शन

Amit Kulkarni

गेल्या दोन दिवसांत लॉकडाऊनचा फज्जा

Omkar B
error: Content is protected !!