तरुण भारत

… तर संस्कृतीसह अस्तित्वच धोक्यात येणार

पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

प्रखर वक्ते तथा नामवंत पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी गोमंतकीयांची मने जिंकली. आपल्या सडेतोड भाषणातून त्यांनी उपस्थितांच्या डोळय़ात झणझणीत अंजन घातले. आताच वेळेत आपण जागे झालो नाही तर आपल्या संस्कृतीसह आपले अस्तित्वच धोक्यात येईल याची जाणीव त्यांनी करून दिली. येथील मिनेझीस ब्रागांझा सभागृहात तसेच कुंडई येथील तपोभूमी संकुलात परमपूज्य ब्रह्मानंद स्वामी सभागृहात त्यांची दोन व्याख्याने झाली.

मिनेझीस ब्रागांझा सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे या नात्याने गुरुदास पावसकर यांनी केले. यावेळी भारत विकास परिषदेचे अध्यक्ष किरण वेर्णेकर, सचिव प्रदीप लोटलीकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

भारत विकास परिष्देच्या पर्वरी शाखेचे कार्याध्यक्ष विष्णुदास चिपळूणकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.

विदेशी आक्रमण आणि सभ्यतेचा संघर्ष असा पत्रकार पुष्पेंद कुलश्रेष्ठ यांचा व्याख्यानाचा विषय होता. त्यांनी आपल्या जाज्वल्य विचारांनी राष्ट्र आणि देश यामधील फरक स्पष्ट केला. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तसेच सनातन धर्मावर गदा आणण्याचा इतिहासात कसा प्रयत्न झाला यावर प्रकाश टाकला व आता भविष्यात वेळीच सावध होण्याचे आवाहन केले.

डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गायिलेल्या ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमास प्रारंभ झाला. कोषाध्यक्ष सौ. स्वरुपा गदग, सौ. शिल्पा शेणवी यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. राताबोली यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. तसेच स्वागतही केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता  झाली.

तपोभूमीवर झालेल्या कार्यक्रमात परमपूज्य ब्रह्मेशानंद स्वामींच्या हजेरीत पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी सनातन धर्माच्या संवर्धनाची हाक मारली. यावेळी कपिलेश्वरी सम्राट क्लबचे अध्यक्ष नितीन ढवळीकर, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष किरण वेर्णेकर, गोवा प्रांत कार्यवाह प्रदीप लोटीलकर, प्रशांत चिमुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. नीलेश नाईक यांनी ओळख करून दिली.

प. पू. ब्रह्मेशानंद स्वामींच्या हस्ते प्रमुख वक्ता पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांची श्री सरस्वती मातेची मूर्ती व श्रीफळ, शाल देऊन सन्मान करण्यात आला. तसेच किरण वेर्णेकर, नितीन ढवळीकर, मुख्य जलसिंचन अभियंता प्रमोद बदामी व सौ. बदामी आणि कार्यक्रम यशस्वी करण्यास झटलेल्या इतर पदाधिकाऱयांचा सन्मान करण्यात आला.

Related Stories

सरकारी कर्मचाऱयांसाठी कामकाज सूचना जारी

tarunbharat

मुरगावच्या महिला शक्तीचा आवाज दडपण्याचा नगरविकासमंत्र्यांचा प्रयत्न- संकल्प आमोणकर

Amit Kulkarni

माशेल बसस्थनकावर येणाऱया भटक्या गुरांचा बंदोबस्त करा

Patil_p

आज दसरोत्सवात भरगच्च कार्यक्रम

Amit Kulkarni

मंत्री माइकल लोबो यांची म्हापश्यात एंट्री आणि चर्चेला उधाण

Patil_p

आमोणेचे निवृत्त मुख्याद्यापक नाईक यांचा सत्कार

Omkar B
error: Content is protected !!