तरुण भारत

मंत्रीच सेक्स स्कँडलमध्ये गुंतल्यावर महिलांना सुरक्षा कशी मिळेल ?

मंत्रीच सेक्स स्कँडलमध्ये गुंतल्यावर महिलांना सुरक्षा कशी मिळेल ?

प्रतिनिधी /मडगाव

Advertisements

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उघडकीस आणलेल्या सेक्स स्कँडलच्या घटनेचा संदर्भ देत गोवा फॉरवर्ड पक्षाच्या उपाध्यक्ष ऍड. अश्माबी यांनी या भाजप मंत्र्याला तातडीने मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी केली आहे. ऍड. अश्माबी यांनी बुधवारी नगरसेविका निमिषा फालेरो यांच्यासह पत्रकार परिषद घेतली.

यावेळी अश्माबी म्हणाल्या की, भाजपच्या मंत्रिमंडळात हा मंत्री अजूनही असल्याने या पक्षात नैतिकता नसल्याचे सिद्ध होते. एक भाजप मंत्री एका महिलेचे लैंगिक शोषण करत आहे आणि संपूर्ण राज्यात ही बातमी पोहोचली आहे हे माहीत असूनही भाजप महिला मोर्चा या मुद्यावर का गप्प आहे, असा प्रश्न त्यांनी केला आहे. पणजीतील पोटनिवडणुकीनंतर त्यांना बलात्काऱयाच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळत आहे यासाठी त्या मूक झाल्या आहेत का, असा प्रश्न त्यांनी भाजप महिला मोर्चाला केला आहे.

या घटनेच्या विरोधात आवाज उठवणारे भाजपचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनाही या घटनेबाबत स्पष्टीकरण देण्यास आणि मंत्र्यांचे नाव घेण्यास अश्माबी यांनी सांगितले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी घेतलेल्या मुद्यावर आपला पक्ष त्यांच्याबरोबर आहे, असे त्यांनी सांगितले. गुन्हय़ात भागीदार असलेल्या आणि स्वतःच्या मंत्र्याचे संरक्षण करणाऱया भाजप सरकारकडून महिलांच्या सुरक्षेची अपेक्षा कशी करता येईल, असा सवाल त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सेक्स स्कँडलमध्ये गुंतलेल्या त्या मंत्र्याला तत्काळ काढून टाकावे, असे अश्माबी म्हणाल्या.

Related Stories

राजीव कला मंदिरच्या ऐतिहासिक नाटय़ स्पर्धेत नागेशी-बांदोडाचे ‘स्वामी’ प्रथम

Amit Kulkarni

समुद्रातील चक्रीवादळामुळे आज जोरदार पावसाची शक्यता

Amit Kulkarni

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर पहिल्या गोवा भेटीवर

Patil_p

बाणावलीतील मच्छीमारांकडून 5 कासवांना जीवदान

Omkar B

ताळगांव येथे पंचायत गृह आवश्यक

tarunbharat

पद्मभूषण लक्ष्मण पै यांच्यावर मडगावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!