तरुण भारत

राजकीय पक्षांनी विशेष अधिकारी नेमावा

मुख्य निवडणूक अधिकाऱयांची सूचना

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी विविध राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक बोलावून आगामी विधानसभा निवडणुकीशी संबधित विविध विषयांवर चर्चा केली. सर्व राजकीय पक्षांनी एक विशेष अधिकारी (नोडल ऑफिसर) नेमण्याची सूचना कुणाल यांनी केली असून निवडणूक आयोगातर्फे सदर अधिकाऱयास निवडणुकीच्या विविध कामांबाबत माहिती व प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले आहे.

 निवडणूक प्रक्रियेत निर्माण होणारे प्रश्न शंका तक्रारी यावर हा अधिकारी आयोगाशी संपर्क साधून त्यावर योग्य ती कार्यवाही करेल, असे सांगण्यात आले. काँग्रेसचे उपाध्यक्ष आल्तिनो गोम्स, भाजपाचे पुंडलिक राऊत देसाई, मगोपचे संदीप वेरेकर, गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत हे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत, संयुक्त अधिकारी आईशा वायंगणकर, साहाय्यक अधिकारी संगीता यांनी बैठकीस हजेरी लावली होती.

केंद्रीय निवडणूक आयोगाची एकंदरीत मार्गदर्शक तत्वे आणि नियम-अटी यांची माहिती राजकीय पक्षांना देण्यात आली. पक्षाच्या नोडल ऑफिसरांनी ही माहिती पक्षातील सर्व उमेदवार, नेते, इतर पदाधिकाऱयांना द्यावी. आणि त्यांच्या तक्रारी, गाऱहाणी पक्ष पातळीवरच सोडवावी, अशी त्यामागील संकल्पना आहे.

नोडल ऑफिसरला प्रशिक्षित करणार

गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एकूण मतदान केंद्राची माहिती  कुणाल यांनी दिली. मतदारयादी उजळणी, खास मोहीम, नवमतदार नोंदणी व इतर तपशील त्यांनी राजकीय पक्षांसमोर मांडला. उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र, खर्चाचे नियम, उमेदवारी अर्ज निवडणूक एजंट याबाबत त्यांनी माहिती दिली. नोडल ऑफिसरला या प्रकरणी प्रशिक्षित केले जाणार असून तो आपापल्या पक्षांचे शंका निरसन करेल, असेही कुणाल यांनी सूचित केले.

Related Stories

इन्स्ट्राग्रामवर बदनामी करणाऱया अनोळखीवर गुन्हा

Patil_p

स्थिर सरकारमुळे भाजपात सध्या अन्य दोघां आमदारांची गरज नाही- मंत्री

Patil_p

स्वच्छता अभियानावर वास्कोत चर्चा

Patil_p

आरोग्य कोविडयोद्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर

Amit Kulkarni

सांताक्रूझ येथे गोळी लागून युवकाचा मृत्यू

Patil_p

लसीकरण मोहिमेस आचारसंहितेचा फटका

Amit Kulkarni
error: Content is protected !!