तरुण भारत

अमित पालेकर यांची प्रकृती खालावली

उपोषणाचा तिसरा दिवस : डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

जुने गोवेतील बेकायदा बांधकाम पाडून दोषींना शिक्षा झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार करून आमरण उपोषण आरंभ केलेले ऍड. अमित पालेकर यांची उपोषणाच्या तिसऱया दिवशी प्रकृती खालावली. मात्र, असे असले तरीही उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नगर विकास प्राधिकरणाने नुकताच सदर बांधकामाचे परवाने रद्द करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचा आपण अभ्यास करणार असून त्यातील सत्यता पटून सरकारवरील विश्वास दृढ होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार आहे असे पालेकर यांनी म्हटले आहे. सदर बांधकाम करणाऱयांना पंचायतीने काम थांबवण्याची नोटीसही बजावली आहे, पण ती पुरेशी नाही. ही केवळ धूळफेक आहे. पाडण्याच्या आदेशाबद्दल कोणी बोलत नाही. एकदा बांधकाम पाडण्याचे आदेश जारी केले की नंतरच अधिकारी काय म्हणत आहेत यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो, अशी प्रतिक्रिया पालेकर यांनी दिली.

प्रशासकीय यंत्रणा याला फसवणूक म्हणत आहेत. पण अशा प्रकारची फसवणूक करण्यासाठी संबंधित अधिकाऱयांच्या पाठिंब्याची गरज असते. जर अधिकारीच फसवणूक झाल्याचे म्हणत असतील, तर त्यांनी यातून बाहेर पडून दोषींची नावे जाहीर केली पाहिजे, असे पालेकर पुढे म्हणाले.

पालेकर यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच अनेकजण त्यांच्या समर्थनार्थ पुढे येत असून भंडारी समाजाचे सदस्य अनिश बकाल यांच्यासह अनेक जागरूक नागरिकांनी भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला आहे. आंदोलनस्थळी उपस्थित एका महिलेने सांगितले की, आमरण उपोषण करणे सोपे नाही, ती एक कठीण तपश्चर्या आहे. आम्ही त्याला पाठिंबा देतो. जुने गोवे हे  सुट्टीचे ठिकाण नव्हे तर प्रार्थनेचे ठिकाण आहे. देव त्याला आशीर्वाद देईल, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, याप्रश्नी प्रतिक्रिया देताना आपचे प्रदेश संयोजक राहूल म्हांबरे यांनी, केवळ तांत्रिकी परवाने मागे घेऊन भागणार नाही, असे म्हटले आहे. सदर बेकायदा बांधकाम करणाऱयास कारणे दाखवा नोटीसही द्यावी लागेल, तसेच वारसास्थळातील हे बांधकाम पाडावे लागेल, असे ते म्हणाले.

Related Stories

दिवसभरात 52 दगावले, 2814 नवे बाधित

Amit Kulkarni

नीलेश काब्राल यांची उमेदवारी दाखल

Amit Kulkarni

पाळोळे येथील प्रसाधनगृहाचे उद्या उद्घाटन

Amit Kulkarni

अर्भकाच्या मृतदेहासंबंधी चौकशी करण्याची मागणी

Omkar B

दाबोळी विमानतळावर 50 लाखांचे सोने जप्त

Omkar B

साळगावात ज्येष्ठ कार्यकर्त्यालाच तिकीट मिळेल

Amit Kulkarni
error: Content is protected !!