तरुण भारत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज; आदित्य ठाकरेंसोबत ‘वर्षा’वर दाखल

प्रतिनिधी/मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज, गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मानेच्या दुखण्यानंतर मुख्यमंत्री मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात १० नोव्हेंबरला दाखल झाले होते. १२ नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता २१ दिवसांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयातून घरी परतलेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली. गुरुवारी केलेल्या तपासण्यांच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह ते वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले.

Advertisements

Related Stories

९०० कर्मचाऱ्यांना बेरोजगार करणाऱ्या भारतीय सीईओंना दिली ‘सुट्टी’

Abhijeet Shinde

सोलापूर : खासदार ओमराजे यांचा बार्शीतील सुर्डी गाव दत्तकचा प्रस्ताव

Abhijeet Shinde

खासदार मोहनभाई डेलकर यांची आत्महत्या

datta jadhav

ड्रग्ज कनेक्शनमध्ये बड्या अभिनेत्री

Abhijeet Shinde

सावधान, दंड वाढलाय नियम मोडू नका विठ्ठल शेलार

Patil_p

सांगली जिल्ह्यात आणखी आठ जण कोरोनाबाधित

Abhijeet Shinde
error: Content is protected !!