तरुण भारत

राज्यस्तरीय टेटे स्पर्धेत सान्वी, आयुषी, तनिष्का विजेते

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

बेंगळूर येथील मल्लेश्वरम एम. एस. रामय्या राज्यस्तरीय अग्रमानांकित टेबल टेनिस स्पर्धेत विविध गटात बेळगावच्या संगम बैलूर अकादमीच्या सान्वी मांडेकर, आयुषी गोडसे, तनिष्का काळभैरव या तिघीनी विजेतेपद पटकाविले.

Advertisements

मल्लेश्वरम येथील टेबलटेनिस सभागृहात आयोजित एम. एस. रामय्या राज्यस्तरीय अग्रमानांकित टेबलटेनिस स्पर्धेत 15 वर्षाखालील गटातील अंतिम सामन्यात बेळगावची सान्वी मांडेकरने तिसऱया मानांकित निहारिका बेंगळूर हिचा 11-6, 10-12, 11-7, 11-6 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले.

13 वर्षाखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात बेळगावच्या आयुषी गोडसेने द्वितीय मानांकित समृती सुदर्शन हिचा 13-11, 11-8, 11-6 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. 11 वर्षाखालील मुलींच्या गटातील अंतिम सामना बेळगावच्या तनिष्का काळभैरवने राशी व्ही. राव हिचा 11-4, 11-4, 7-11, 11-2 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. वरील तिन्ही विजेत्या स्पर्धकांना संगम बैलूर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.

Related Stories

आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी अथर्व सावनूरची निवड

Amit Kulkarni

बेकायदा दारूसाठा बहाद्दरवाडी येथे जप्त

Amit Kulkarni

घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्टतर्फे आर. के. कुटे यांना श्रद्धांजली

Amit Kulkarni

खुनी हल्ला प्रकरणी विशाल चव्हाणला अटक

Patil_p

ज्येष्ठ साहित्यिक प्रा.अनंत मनोहर यांचे निधन

Amit Kulkarni

प्रशासनाला प्रतिक्षा 4 हजार 600 स्वॅब तपासणी अहवालांची

Patil_p
error: Content is protected !!