तरुण भारत

कोंबडी बाजार भंगीबोळातील पार्किंगमुळे व्यावसायिक त्रस्त

किमान पादचाऱयांना ये-जा करण्यासाठी रस्ता सोडण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

शहरात दुचाकी वाहने पार्क करण्यासाठी पार्किंग सुविधा नसल्याने उपलब्ध असलेल्या जागेत पार्किंग केले जाते. बाजारपेठेत येणारे नागरिक विविध भंगीबोळात तसेच मुख्य रस्त्याशेजारी दुचाकी वाहने पार्किंग करत आहेत. कोंबडी बाजार येथील भंगीबोळात वाहने पार्क करण्यात येत असल्याने येथील रहिवाशांसह व्यावसायिकांची डोकेदुखी वाढली आहे. किमान पादचाऱयांना ये-जा करण्यासाठी रस्ता सोडा, अशी मागणी होत आहे.

पार्किंगच्या समस्येचे निवारण करण्यासाठी सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा केला जातो. बाजारपेठेतील पार्किंग समस्येबाबत व्यावसायिकांनी तक्रार केल्यानंतर रहदारी पोलिसांसमवेत महापालिका आयुक्त आणि आमदारांनी समस्येची पाहणी 15 दिवसांपूर्वी केली होती. याबाबत विविध उयापयोजना राबविण्याबाबत चर्चा देखील झाली होती. मात्र याबाबत आतापर्यंत कोणतीच उपाययोजना हाती घेण्यात आली नाही. काही ठिकाणी रस्त्यावर वाहने पार्क करण्यात येत असून, बाजारपेठेतील दोन्ही बाजूचे रस्ते, दुचाकी वाहने, फेरीवाले आणि भाजी विपेत्यांमुळे व्यापले गेले आहेत. वाहने पार्क करण्यासाठी जागा मिळत नसल्याने भंगीबोळांचा वापर करण्यात येत आहे. मारुती गल्ली आणि कडोलकर गल्लीच्या मध्यभागी असलेल्या गणपत गल्लीतील कोंबडी बाजारपासून कावेरी कोल्ड्रींग पर्यंतच्या भंगीबोळात दुचाकी वाहने पार्क केली जातात. पण वाहने पार्क करताना कोणतीच शिस्त पाळली जात नाही. परिसरातील व्यावसायिकांची आणि कामगारांची वाहने या ठिकाणी पार्क करण्यात येत आहेत. पण सदर वाहने रस्त्यावर तसेच काही नागरिकांच्या दरवाजासमोर पार्क करण्यात येत असल्याने अन्य वाहनधारकांना व पादचाऱयांना ये-जा करणे मुश्कील बनत आहे.

रस्त्यावरील अडथळे दूर करा

या परिसरातील व्यावसायिकांना वाहने पार्क करण्यास जागा शिल्लक राहत नाही. काहीवेळा इतकी गर्दी असते की, पादचाऱयांना ये-जा करण्यासाठी रस्ता नसतो. त्यामुळे याबाबत रहदारी पोलीस खाते आणि महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही. काही रहिवाशांना घरात जाण्यासाठी देखील रस्ता शिल्लक रहात नाही. व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सदर समस्येची पाहणी करून पार्किंग व्यवस्था उपलब्ध करावी, तसेच रस्त्यावरील अडथळे दूर करावेत, अशी मागणी व्यावसायिक आणि रहिवाशांतून होत आहे.

Related Stories

ग्रा. पं. साठी खानापूर तालुक्यात पहिल्या दिवशी एकच अर्ज दाखल

Patil_p

केएमएफच्यावतीने मदतनिधीचे वितरण

Patil_p

प्राणघातक हल्ल्यात वृद्ध ठार

Rohan_P

बेळगाव जिल्हय़ात शनिवारी 411 कोरोनाबाधितांची नोंद

Rohan_P

वडगाव ढोर गल्लीत श्री रामनवमी उत्साहात साजरी

Amit Kulkarni

विविध ठिकाणी मराठी भाषादिन साजरा

Amit Kulkarni
error: Content is protected !!