तरुण भारत

शेड उभारण्यावरून वादावादी

बापट गल्ली येथे तणाव : काहीकाळ दुकाने बंद

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

बापट गल्ली येथे शेड उभारल्यावरून दोन गटांत वादावादीचा प्रसंग घडला. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. व्यापाऱयांनी आपली दुकाने बंद ठेवली. खडेबाजार पोलीस स्थानकाबाहेरही स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती.

बुधवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास बापट गल्ली येथील एका मजारवर शेड उभारण्यावरून वादावादीचा प्रसंग घडला. परिसरात तणावाची स्थिती निर्माण होताच स्थानिक नागरिकांनी आपली दुकाने बंद केली. खडेबाजार पोलीस स्थानकाबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती.

पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्या उपस्थितीत सायंकाळी नागरिकांची बैठक झाली. या बैठकीत बापट गल्ली येथील समस्या काय आहे? यावर चर्चा केली. स्थानिक प्रमुखांच्या उपस्थितीत तोडगा काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

दुर्गमभागाच्या विकासासाठी लोकमान्य प्रयत्नशील

Patil_p

कॅन्टोन्मेंट शाळेत होणार बहुविध क्रीडा सुविधा

Patil_p

42 पीडीओंवर 59 ग्रामपंचायतींचा कार्यभार

Amit Kulkarni

कन्नड विषयासंदर्भात संभ्रम

Amit Kulkarni

पार्किंग शुल्कपेक्षा कर्मचाऱयांचा पगार अधिक

Patil_p

बोगस परीक्षार्थींना फूस खऱया पोलिसांची

Omkar B
error: Content is protected !!