तरुण भारत

तिसऱया दिवशी 88 शिक्षकांच्या बदल्या

आणखी दोन दिवस कौन्सिलिंगची शक्यता : बैलहोंगल, कित्तूर विभागात सर्वाधिक बदल्या

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने सोमवारपासून प्राथमिक विभागाच्या शिक्षक बदली कौन्सिलिंग प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. बुधवारी तिसऱया दिवशी 400 शिक्षकांपैकी 88 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. बेळगाव शहरासह तालुका, बैलहोंगल, कित्तूर या विभागांमध्ये सर्वाधिक बदल्या आहेत.

बदली कौन्सिलिंगसाठी बुधवारी सकाळपासूनच बेळगाव, खानापूर, कित्तूर, सौंदत्ती, रामदुर्ग, बैलहोंगल या तालुक्मयांमधून शिक्षक दाखल झाले होते. शिक्षकांच्या क्रमांकानुसार कौन्सिलिंगसाठी बोलाविण्यात येत होते. खानापूर, रामदुर्ग व सौंदत्ती येथे 25 टक्के जागा रिक्त असल्याने त्या तीन तालुक्मयांतील शिक्षकांना बदली प्रक्रियेत भाग घेता आले नाही. त्यामुळे अनेकांना पुन्हा माघारी फिरावे लागले.

एकूण 195 शिक्षकांच्या बदल्या

बेळगाव शहरासह बेळगाव तालुका, कित्तूर, बैलहोंगल या विभागांसाठी कौन्सिलिंग प्रक्रिया पार पडली. बुधवारपर्यंत एकूण 195 शिक्षकांनी बदल्या घेतल्या. उर्वरित कौन्सिलिंगची प्रक्रिया अजून दोन दिवस चालणार आहे. 

यावेळी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेब्बळ्ळी, जनरल सेपेटरी रमेश गोनी, सेपेटरी के. एस. राचण्णावर, वाय. एम. पाटील, मल्लिकार्जुन चवलगी, शिवनंदा रिदबसण्णावर यांच्यासह शिक्षण खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

हेस्कॉम वळतेय खासगीकरणाकडे

Patil_p

सिग्नलच्या दुरुस्तीकामामुळे वाहतूक कोंडी

Omkar B

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

Patil_p

दुचाकी अपघातात महिला ठार

tarunbharat

बेळगाव विभागाचा बारावीचा निकाल 59.7 टक्के

Rohan_P

माजी सैनिकांतर्फे वीरपत्नी, निवृत्त लष्करी अधिकाऱयांचा सत्कार

Omkar B
error: Content is protected !!