तरुण भारत

विजयाच्या स्थितीत नाही काँग्रेस पक्ष : गुलाम नबी आझाद

श्रीनगर  ः पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 300 जागा जिंकू शकेल असे वाटत नाही. इतक्या अधिक जागा मिळण्याच्या स्थितीत काँग्रेस पक्ष नसल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मीरच्या पुंछ येथील सभेला संबोधित करताना म्हटले आहे.  कलम 370 बद्दलचे स्वतःचे मौन योग्य असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे. केवळ सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच हे कलम पुन्हा लागू करते. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्याने ते पुन्हा लागू करणार नसल्याचे आझाद यांनी सांगितले आहे. सरकार स्थापन करण्यासाठी 300 खासदारांची गरज आहे. 2024 च्या निवडणुकीत आमचे 300 नेते जिंकून लोकसभेत पोहोचतील असे आश्वासन देऊ शकत नाही. सद्यकाळात मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. मी केवळ लोकांना भेटण्यास आणि त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आलो आहे. जम्मू-काश्मीरकडून राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. स्वतःचे अधिकार सुरक्षित करण्यासाठी काम करावे लागेल, असे आझाद यांनी म्हटले आहे.

Related Stories

केंद्र शासित प्रदेशात एसएमएस सेवेस प्रारंभ

Patil_p

बलुचिस्तान स्वातंत्र्ययोद्धय़ा करीमा बलोच यांचा संशयास्पद मृत्यू

Patil_p

पहिल्या टप्प्यात 20 जणांना मंत्रिपद?

Patil_p

पंजाब : गेल्या 24 तासात 2,299 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

धारवाडमध्ये कोरोनाचा पहिला बळी

Rohan_P

पंतप्रधानांसह खासदारांच्या वेतनात तीस टक्के कपात

prashant_c
error: Content is protected !!