तरुण भारत

योगी आदित्यनाथ सरकारमुळे उत्तरप्रदेश माफियांपासून मुक्त

सहारनपूर : भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सहारनपूरच्या मां शाकंबरी  विद्यापीठाच्या कार्याच्या शुभारंभप्रसंगी बोलताना पश्चिम उत्तरप्रदेशात विकासकार्य करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंड-माफियांपासून मुक्ती मिळवून दिल्याचे म्हटले आहे. योगींच्या नेतृत्वात उत्तरप्रदेशातील माफिया आणि गुंडांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. तसेच हत्या, लुटपाटीच्या घटना मोठय़ा प्रमाणात कमी झाल्याचा दावा शाह यांनी केला. पूर्ण जगात भारताला सन्मान मिळवून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. योगींनी उत्तरप्रदेशला भ्रष्टाचाराच्या मार्गावरून बाहेर काढत विकासाच्या मार्गावर आणण्याचे काम केले. अखिलेश यादव यांच्या सरकारच्या कार्यकाळात उत्तरप्रदेशात माफियांचे वर्चस्व होते, राज्यात कायदा-सुव्यवस्था लागू करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. योगींच्या शासनात दरोडय़ाच्या घटनांमध्ये 70 टक्क्यांची घट झाली आहे. लुटीच्या घटना 69 टक्के, हत्येच्या घटनांमध्ये 30 टक्के आणि हुंडाबळींमध्ये 22.5 टक्क्यांची घट झाल्याचे विधान शाह यांनी केले.

Related Stories

निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा

datta jadhav

आम आदमी पार्टीच्या आमदार आतिशी यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

पंजाब : शेतकरी आंदोलनात सहभागी न झाल्यास 5 हजारांचा दंड

datta jadhav

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

वाहनात खारुताईने लपविले 158 किलो अक्रोड

Patil_p

भगवान श्रीरामाला आता ‘लाल सलाम’

Patil_p
error: Content is protected !!