तरुण भारत

‘आप’मध्ये प्रवेश करू इच्छित होते सिद्धू

केजरीवाल यांचा मोठा दावा : आताही काँग्रेस सोडण्याची तयारी

वृत्तसंस्था /चंदीगड

Advertisements

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासंबंधी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठा दावा केला आहे. नवज्योत सिद्धू हे आप ’मध्ये येऊ इच्छित होते, पण आता ते येणार नाहीत. सिद्धू आता काँग्रेसमध्येच खूश आहेत असे केजरीवाल म्हणाले.

सिद्धू आताही काँग्रेस सोडण्यासाठी तयार असल्याचे केजरीवालांनी त्यानंर म्हटल्याने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. सिद्धू यांनी देखील अनेकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा इशारा दिला आहे.

काँग्रेसमध्ये सिद्धू हे सुनील जाखड आणि त्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पक्षातील मुख्य प्रवाहापासून दूर करण्यास यशस्वी ठरले होते. पण आता त्यांचा मार्ग अवघड ठरला आहे. त्यांनी मरणव्रत सुरू करण्याची धमकी दिल्यावरही राज्य सरकारने स्पेशल टास्क फोर्सचा अमली पदार्थ विषयक अहवाल उघड केलेला नाही. सिद्धू स्वतःला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून सादर करत आहेत. तर विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत चन्नी देखील दावेदारीवर ठाम आहेत. काँग्रेस पक्षाऐवजी सिद्धू हे स्वतःचे ‘पंजाब मॉडेल’ घोषणापत्र म्हणून मांडत आहेत.

‘आप’ला चेहऱयाचा शोध

पंजाबमध्ये ‘आप’च्या दृष्टीकोनातून सर्वात मोठी चर्चा मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱयाची आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा शीख समाजातील असेल असे सांगणारे केजरीवाल त्याचे नाव सांगणे टाळत आहेत. पक्षाचे संगरूर येथील खासदार भगवंत मान यांच्या नावाची चर्चा असली तरीही केजरीवाल उघड वक्तव्य करणे टाळत आहेत. तरीही केजरीवाल सिद्धू यांचे वारंवार कौतुक करत आहेत.

जाखडांबद्दल दावा

पंजाबमध्ये उमेदवारी देण्यापूर्वी आमदारांसंबंधी आम्ही सर्वेक्षण करविले होते. दोन आमदारांना विरोध दिसून आल्याने आम्ही त्यांना उमेदवारी नाकारली, याचमुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आमच्या आमदारांना प्रवेश देऊन काँग्रेसला आनंद होतोय, पण त्याचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेसला रामराम ठोकला, आता माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड देखील काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केजरीवालांनी केला.

Related Stories

भाताच्या आधारभूत दरात वाढ

Patil_p

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री रोसैया कालवश

Patil_p

अर्थव्यवस्था तेजोमय !

Patil_p

काश्मीरमध्ये पोलिसांना मिळणार बुलेटप्रूफ वाहन

Patil_p

केंद्र सरकारला लसीकरणावरून ‘डोस’

Patil_p

‘भारत बंद’ला वाढता पाठिंबा

Patil_p
error: Content is protected !!