तरुण भारत

पाकिस्तानी विद्यार्थ्यांचे भवितव्य चीनमुळे टांगणीला

चीनच्या महाविद्यालयांमध्ये परतण्याची अनुमती नाही : उर्वरित देशांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश

वृत्तसंस्था /इस्लामाबाद

Advertisements

चीनमधील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांसोबत चीनने मोठा अन्याय केला आहे. चीनच्या भूमिकेमुळे सुमारे 11 हजार पाकिस्तानी विद्यार्थ्यांची कारकीर्द उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे. चीनमध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यावर जानेवारी 2020 मध्ये बहुतांश पाकिस्तानी विद्यार्थी मायदेशी परतले होते. या विद्यार्थ्यांना 7 महिन्यांनी जुलैमध्ये स्वतःच्या महाविद्यालयांमध्ये पोहोचायचे होते. आता 2021 वर्ष संपण्याच्या मार्गावर असतानाही चीनचे सरकार या हजारो पाकिस्तानी विद्यार्थ्यांना देशात येण्याची अनुमती देत नाही.

या विद्यार्थ्यांनी इम्रान खान सरकार आणि चीनच्या दूतावासाकडे दाद मागितली पण कुठलाच लाभ झाला नाही. चीनचा दूतावास या विद्यार्थ्यांच्या ईमेल्सना प्रतिसाद देखील देत नाही. तर पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया अकौंट्सनाच ब्लॉक केले आहे.

केवळ पाकिस्तानींना प्रवेश नाही

पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी चिनी लस टोचून घेतील, सर्व आवश्यक दस्तऐवज सादर केले, आरटी-पीसीआर अहवाल जोडला तरीही चीनने त्यांना व्हिसा प्रदान केलेला नाही. आता हे विद्यार्थी आणि त्यांचे पालक अनेकांचे उंबरठे झिजवत आहेत, पण कुणीच त्यांचे दुःख समजून घेण्यास तयार नाही. विशेष बाब म्हणजे चीनने या विद्यार्थ्यांकडून आगाऊ शुल्क आकारले आहे. चीनच्या आडमुठेपणामुळे या विद्यार्थ्यांची स्वप्ने भंग होण्याची स्थिती आहे. चीनने पाकिस्तान वगळता उर्वरित सर्व देशांच्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या महाविद्यालयांमध्ये परतण्याची मंजुरी दिली आहे. पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना परतू न देण्याचे कारण सांगण्याची तसदीही चीनने घेतलेली नाही.

वैद्यकीय विद्यार्थ्यांचे मोठे हाल

चीनच्या विद्यापीठांमध्ये सुमारे 11 हजार पाकिस्तानी विद्यार्थी इंजिनियरिंग तर सुमारे 7 हजार विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. पाकिस्तानचे सरकार ऑनलाइन वैद्यकीय पदवीला मान्यता देत नाही. यामागे देशात ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या बनावट पदव्या सहजपणे मिळणे हे कारण आहे. दुसरीकडे चीनने ऑनलाईन अभ्यासक्रमच होणार असून याच्याच आधारावर पदवी देण्यात येणार असल्याचे चीनने स्पष्ट केले आहे.

Related Stories

भारतातच नाही तर अमेरिकेतही ‘जय श्रीराम’: टाईम्स स्क्वेअरवर झळकणार 3D प्रतिमा

Rohan_P

काळोख्या बोगद्यात गायब झालेल्या रेल्वेचे रहस्य

Patil_p

ब्रिटनच्या नव्या ‘लस’ नियमांमुळे संताप

Patil_p

तालिबानकडून सरकार स्थापनेची घोषणा

datta jadhav

कॅनडात कोरोना रुग्णांची संख्या 95 हजार पार

Rohan_P

विदेशी प्रवाशांवर लक्ष

Patil_p
error: Content is protected !!