तरुण भारत

वयाची सत्तरी ओलांडणाऱयांनी अध्यक्ष होऊ नये : एलन मस्क

न्यूयॉर्क : जगातील सर्वात धनाढय़ एलन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. नेत्यांकडून राजकीय कार्यालये सांभाळण्यासाठी एक वयोमर्यादा निश्चित असावी. ही वयोमर्यादा 70 वर्षांच्या खाली ठेवली जाऊ शकते असे टेस्ला कंपनीचे मालक मस्क यांनी म्हटले आहे. 79 वर्षीय बायडेन आणि ट्रम्प या दोघांनी 2024 मध्ये पुन्हा अध्यक्षीय निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असताना मस्क यांचे हे विधान समोर आले आहे.

मस्क यांच्या विधानानंतर ट्विटरवर चर्चा सुरू झाली आहे. मस्क यांच्या या ट्विटला 61 हजार लोकांनी लाइक केले असून 7 हजारांहून अधिक जणांनी रीट्विट केले आहे. तर 7 हजार जणांनी आतापर्यंत कॉमेंट केली आहे.

Advertisements

ट्विटरवर मस्क यांच्या या भूमिकेला जोरदार समर्थन मिळत आहे. तर नेत्यांना कुठलेच वय नसते असे म्हणणारेही लोक आहेत. अमेरिकेचे सर्वात वृद्ध अध्यक्ष ठरलेले बायडेन यांची लोकप्रियता आता घसरू लागली आहे. 79 वर्षीय बायडेन 2024 च्या निवडणुकीत पुन्हा अध्यक्षीय उमेदवार म्हणून उभे राहणार असल्याचा दावा करत आहेत. कमला हॅरिस यांच्या दावेदारीची डेमोक्रेटिक पक्षात चर्चा सुरू असताना बायडेन यांनी अध्यक्षीय निवडणुकीसाठी दावा केला आहे.

Related Stories

ऍडीबॉडी उपचार पद्धतीने होतोय लाभ

Patil_p

ऑस्ट्रेलियातील वणवे रोखण्यास मिळतेय यश

Patil_p

भारतीय मुलीला ब्रिटनचा तिसऱया क्रमांकाचा पुरस्कार

Patil_p

आता दुतावासावरही ‘ड्रोन’च्या घिरटय़ा

Patil_p

शिकागोत अज्ञाताकडून अंदाधुंद गोळीबार, 14 जखमी

datta jadhav

सायबेरियात सापडली 28 हजार वर्षे जुनी सिंहिण

Patil_p
error: Content is protected !!