तरुण भारत

आजपासून भारत बॉण्ड इटीएफची तिसरी आवृत्ती होणार खुली

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

भारत बॉण्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडची (इटीएफ) तिसरी आवृत्ती आजपासून (3डिसेंबर) गुंतवणूक करण्यासाठी खुली होणार आहे. सदरचा न्यू फंड 3 डिसेंबर रोजी खुला होत 9 डिसेंबर रोजी बंद होणार असल्याची माहिती आहे. भारत बॉण्ड इटीएफच्या तिसऱया आवृत्तीच्या मदतीने सरकार केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील विविध उपक्रमांसाठी 5,000 कोटी रुपये उभारण्याचे संकेत आहेत.

Advertisements

भारत बॉण्ड इटीएफ एक प्रकारचा एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे. जो सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या बाँडमध्ये गुंतवणूक करतो. भारत बॉण्ड ट्रिपल ए रेटिंगच्या सार्वजनिक क्षेत्रातील बाँडमध्येच गुंतवणूक करते. यामधील गुंतवणुकीवर 6.87 टक्क्यांचा परतावा मिळणार आहे. यांच्याअंतर्गत 36 हजार 359 कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन सांभाळले जाते. भारत बॉण्ड इटीएफचे व्यवस्थापन ऍडलव्हाइस म्युच्युअल फंड करते.

पहिल्या, दुसऱया आवृत्तीतील रक्कम

भारत बॉण्ड इटीएफची दुसरी आवृत्ती जुलै 2020 मध्ये सादर करण्यात आली होती, ज्याला तीनपट प्रतिसाद मिळाला होता. याअंतर्गत 11 हजार कोटी रुपये उभारण्यात आले होते. 2019 मध्ये पहिल्या आवृत्तीवेळी भारत बॉण्ड इटीएफमार्फत 12 हजार 400 कोटी रुपये उभारण्यात आले होते.

मागील वर्षभरातील परतावा

मागील एक वर्षभरातील स्थिती पाहिल्यास यामध्ये भारत बॉण्डमध्ये 1 लाख गुंतवणूक केल्यानंतर 1.04 लाख रुपये इतकी झाली आहे. म्हणजे वर्षभराच्या आधारे गुंतवणूकदारांना 4 टक्के लाभ झाल्याची माहिती आहे.

Related Stories

हिरे व्यापाऱयांनी केली कर्मचाऱयांच्या वेतनात वाढ

Patil_p

पोस्टाच्या सर्व बचत योजना ग्रामीण भागात होणार उपलब्ध

Patil_p

ओएनजीसीला बंपर नफा

Patil_p

पतंजली समूहाची उलाढाल 30 हजार कोटींवर

Patil_p

हिरोची नवी मास्ट्रो एज बाजारात

Amit Kulkarni

सेन्सेक्स 870 अंकांनी घसरला, निफ्टीतही घसरण

Patil_p
error: Content is protected !!