तरुण भारत

नव्या वर्षी मारुती सुझुकीच्या कार्स महागणार

जानेवारी 2022 पासून अंमलः कच्च्या मालाच्या किमतीचा प्रभाव

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisements

देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी म्हणून कार्यरत असणारी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने कारच्या किमती नवीन वर्षात म्हणजे जानेवारी 2022 पासून वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रकारातील मॉडेलच्या किमतीत वाढ करणार असल्याचे संकेत कंपनीने दिले आहेत.

कारच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱया कच्च्या मालासह अन्य साहित्याच्या किमती वाढल्यामुळे असा निर्णय घेतला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कच्चा माल महागल्याने कार निर्मितीसाठी येणाऱया खर्चात वाढ झाली आहे. मागच्या एक वर्षापासून कच्च्या मालाच्या किमती कमी होण्याची वाट पाहिली जात होती परंतु तसा कोणताही दिलासा न मिळाल्यामुळे नाईलाजास्तव दरवाढीचा निर्णय घेतला जात असल्याचेही मारुतीने स्पष्ट केले आहे.

विविध स्तरावर किंमती वाढणार

विविध मॉडेल्सच्या किंमती या वेगवेगळय़ा स्तरावर वाढवल्या जाणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षात कंपनीच्या आल्टो, एस क्रॉस, बलेनो, स्विफ्ट, स्विफ्ट डिझाइर व इर्टिगो या गाडय़ा महागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना नव्या वर्षी मारुतीची कार घ्यायची असेल तर जादा पैशाची तजवीज करावी लागणार आहे.

वर्षभरात तीन वेळा किमती वाढविल्या

उपलब्ध अहवालानुसार वाहन क्षेत्रातील कंपन्यांपुढे अमर्यादित अंतर्गत खर्च आणि सेमिकंडक्टरच्या कमतरतेमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासोबत कंपनीने चालू वर्षात जवळपास तीन वेळा मारुतीने आपल्या वाहनांच्या किमतीत सातत्याने वाढ केली असल्याची माहिती आहे.

Related Stories

टीव्हीएस आय क्युब दिल्लीत सादर

Patil_p

जूनमध्ये वाहन विक्रीत उत्साहवर्धक वाढ

Amit Kulkarni

‘स्कोडा कुशाक’चे लवकरच पदार्पण

Patil_p

रॉयल एनफिल्डने उत्पादन थांबविले

Amit Kulkarni

रिवोल्ट आरव्ही 400 चे प्री बुकिंग सुरु

Patil_p

कियाच्या सोनेट कार बुकिंगला उत्तम प्रतिसाद

Omkar B
error: Content is protected !!