तरुण भारत

भारतात ‘उबर’ची व्हॉटसऍपसोबत बुकिंगची सेवा

ऍपऐवजी चॅटच्या मदतीने करता येणार बुकिंग

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisements

उबर आणि व्हॉट्सऍपने देशामध्ये ग्राहकांसाठी व्हॉट्सऍपच्या मदतीने प्रवासाचे बुकिंग करण्याची सुविधा प्राप्त होणार असून यासाठी दोघांमध्ये करार करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आता ग्राहकांना आपला प्रवास निश्चित करण्यासाठी उबर ऍप डाऊनलोड करत त्याच्या आधारे आपले बुकिंग करण्याची आवश्यकता नसून सर्व सुविधा व्हॉटसऍपच्या मदतीने चॅट इंटरफेंस सेवेची मदत घेत बुकिंग करता येणार आहे. उबरने यावेळी दिलेल्या माहितीनुसार जगातील पहिली अशी सेवा आहे, की प्रवासाचे बुपेंग व्हॉटसऍपच्या मदतीने करता येणार असून यासाठी फक्त एका मॅसेजची आवश्यकता असल्याचेही उबरने स्पष्ट केले आहे. 

प्रायोगिक पातळीवर लखनऊमध्ये सेवा

या निर्णया अगोदर कंपनीने लखनऊमध्ये (उत्तर प्रदेश) प्रायोगिक पातळीवर अशा प्रकारची सेवा सुरु करण्यात आली असून येत्या काही काळात भारतामधील अन्य शहरांमध्ये सेवेचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.

भारतीयांसाठी आवश्यक तेवढय़ा सेवा देणार

आम्ही सर्व भारतीयांसाठी प्रवास करणे सोपे होण्यासाठी आम्ही विविध टप्प्यांवर प्रयत्न करणार असून यासाठीच व्हॉट्सऍपसोबत करार केला असल्याने येत्या काळात आणखीन योग्य अशा सेवा देण्यावर भर देणार असल्याचे उबरच्या वरिष्ठ संचालक नंदिनी माहेश्वरी यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

खरीपामध्ये तांदळाचे उत्पादन 10.23 कोटी टनावर ?

Omkar B

आरबीआयच्या घोषणांवर बाजाराची नाराजी

Patil_p

जिओची ‘क्रिकी’मध्ये गुंतवणूक

Patil_p

पेटीएममार्फत बुक करा सिलेंडर

Patil_p

एलकॉन इंजिनियरिंगचा उत्तम परतावा

Patil_p

कार, मोटारसायकलच्या नंबरसाठी केंद्राची नवी योजना

Patil_p
error: Content is protected !!