तरुण भारत

नोव्हेंबरमध्ये निर्यातीत 26 टक्के वाढ

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

कोरोना वायरसमुळे प्रभावीत झालेली अर्थव्यवस्था आता रुळावर येत असल्याचे दिसून येत आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये निर्यातीमध्ये 26 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.

Advertisements

अभियांत्रिकी, पेट्रोलियम उत्पादने, रसायने व समुद्री उत्पादनांची निर्यात 29.88 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी झाली आहे. केंद्र सरकारने या संदर्भात माहिती दिली आहे. आकडेवारीनुसार मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 23.62 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली होती. मागच्या महिन्यामध्ये अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात ही 37 टक्के इतकी लक्षणीय वाढली असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात रकमेत पाहता 8 अब्ज डॉलर्सची झाली आहे. देशाच्या एकूण निर्यातीतील वाटय़ामध्ये अभियांत्रिकी वस्तूंचा हिस्सा 27 टक्के इतका आहे. 2021 मध्ये एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये या कालावधीमध्ये भारताची निर्यात 262.47 अब्ज डॉलर्सची राहिली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये समान कालावधीतील निर्यात पाहिल्यास ती 50 टक्के अधिक राहिली आहे. 2019 च्या समान कालावधीतील निर्यातीची तुलना करता यंदाची वाढही 24 टक्के आहे. 2020 मध्ये निर्यात 175.14 अब्ज डॉलर्सची राहिली होती. तर 2019 मध्ये हा आकडा 211.17 अब्ज डॉलर्सचा होता.

Related Stories

स्पेक्ट्रम लिलावासाठी जियोच पुढे

Patil_p

शेअर बाजार गाठणार एक लाखाचा टप्पा

Patil_p

मार्चमध्ये टायटनची विक्री तेजीत

Patil_p

तिसऱया दिवशी सेन्सेक्समध्ये 422 अंकांची घसरण

Patil_p

पेप्सीकोची डुंझोसोबत भागीदारी

Patil_p

ऑगस्टच्या प्रथम सप्ताहात एफपीआय गुंतवणूक तेजीत

Patil_p
error: Content is protected !!