तरुण भारत

चौथ्या सत्रात सेन्सेक्सची 777 अंकांची उसळी

एचडीएफसी बँक, एचडीएफसी, इन्फोसिस यांच्या कामगिरीचा लाभ

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ातील चौथ्या सत्रात गुरुवारी सेन्सेक्समध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण राहिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये तब्बल 777 अंकांची मजबूत कामगिरी करत बाजार बंद झाला आहे. जागतिक पातळीवर नकारात्मक कल राहिल्याच्या स्थितीमध्येही निर्देशांकांने आपली हिस्सेदारी कायम ठेवत तेजीचा प्रवास कायम ठेवला असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने एचडीएफसी बँक, एचडीएफसी, इन्फोसिस आणि टीसीएसच्या समभागात तेजीचे वातावरण राहिले होते.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने निर्देशांकात सेन्सेक्स 776.50 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 58,461.29 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 234.75 अंकांनी वधारुन 17,401.65 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्समध्ये प्रामुख्याने एचडीएफसीचे समभाग जवळपास चार टक्क्यांनी सर्वाधिक तेजीत राहिले होते, यासोबतच पॉवरग्रिड कॉर्प, सनफार्मा, टाटा स्टील, टेक महिंद्रा आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय बँक आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग नुकसानीत बंद झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारांचा कल नकारात्मक राहिल्याच्या वातावरणातही देशातील बाजाराचा निर्देशांक तेजीत राहिल्याचे दिसून आले. यामध्ये जीडीपी संदर्भातील आकडेवारीसह प्रमुख क्षेत्रांपैकी आयटी, आर्थिक आणि धातू यांचे समभाग तेजीत राहिल्याने बाजाराला मजबूत स्थिती प्राप्त करण्यात यश मिळाले आहे.

केंद्र सरकारचा राजकोषीय तोटा हा चालू आर्थिक वर्षामध्ये ऑक्टोबरपर्यंतच्या आर्थिक स्थितीचा अंदाज 36.3 टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये राजकोषीय तूटीच्या पातळीसह महसूल विभागात सुधारणात्मक स्थिती राहिल्याचे दिसून आले आहे. याचा लाभ भारतीय बाजाराला झाल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.

आशियातील अन्य बाजारात हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे लाभात राहिले आहेत. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 2.41 टक्क्यांनी वधारुन 70.53 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

 • एचडीएफसी. 2809
 • पॉवरग्रिड कॉर्प 214
 • सन फार्मा…… 768
 • टाटा स्टील… 1112
 • टेक महिंद्रा… 1629
 • एचसीएल टेक 1184
 • बजाज ऑटो.. 3326
 • बजाज फिनसर्व्ह 17752
 • बजाज फायनान्स 7179
 • इन्फोसिस…. 1748
 • टीसीएस…… 3641
 • महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 848
 • आयटीसी……. 225
 • भारती एअरटेल 732
 • एशियन पेन्ट्स 3183
 • एचडीएफसी बँक 1525
 • इंडसइंड बँक… 945
 • टायटन…….. 2385
 • डॉ.रेड्डीज लॅब 4655
 • एनटीपीसी….. 128
 • मारुती सुझुकी 7325
 • रिलायन्स इंडस्ट्रीज 2483
 • कोटक महिंद्रा 1964
 • स्टेट बँक……… 477
 • लार्सन ऍण्ड टुब्रो 1792
 • नेस्ले………. 19430
 • अदानी पोर्ट…. 738
 • एसबीआय लाईफ 1188
 • विप्रो…………. 646
 • हिंडाल्को…….. 432
 • ब्रिटानिया…. 3578
 • कोलगेट……. 1440
 • डिएलएफ……. 386

समभाग घसरलेल्या कंपन्या

 • आयसीआयसीआय 722
 • ऍक्सिस बँक…. 676
 • अल्ट्राटेक सिमेंट 7322
 • वेदान्ता………. 338
 • गोदरेज………. 921
 • अशोक लेलँड… 120
 • बायोकॉन……. 367
 • सिप्ला……….. 921
 • पीआय इंडस्ट्रीज 2942
 • कॅस्ट्रोल………. 126
 • नाटको फार्मा  840

Related Stories

नव्या विक्रमासह सेन्सेक्स-निफ्टीची तेजी कायम

Patil_p

वेलस्पन एंटरप्रायझेसला मिळाले कंत्राट

Amit Kulkarni

बाजारात सेन्सेक्स, निफ्टीची विक्रमी झेप

Patil_p

महिंद्राची ऑनलाईन सेवा सुरु

Patil_p

औद्योगिक उत्पादनांचा वृद्धीचा वेग सलग तिसऱया महिन्यात सुस्त

Amit Kulkarni

सातपुडय़ाचा डोंगरीदेवाचा पाईक

Patil_p
error: Content is protected !!