तरुण भारत

जोर लगाकर…..

प्रवाशांना धावपट्टीवर विमानाला द्यावा लागला धक्का : नेपाळमधील विमानतळाची खराब अवस्था

वाहनात बिघाड झाल्यास ते स्टार्ट व्हावे किंवा अशा ठिकाणी पेहोचवावे जेणेकरून वाहतुकीला अडथळा येणार नाही या उद्देशाने त्याला धक्का देण्यात येतो. पण आता नेपाळमधून एक व्हिडिओ समोर आला असून यात विमानतळावर एका विमानाला लोक धक्का देत असल्याचे दिसून येते.  हे विमान तारा एअरलाइन्सचे असून धक्का देण्याची घटना बजूरा येथील कोल्टी विमानतळावर घडली आहे.

Advertisements

सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणावर शेअर करण्यात येत असलेल्या या व्हिडिओत प्रवासी आणि सुरक्षा कर्मचारी कोल्टी विमानतळाच्या धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानाला धक्का देताना दिसून येतात. तारा एअरलाइन्सचे हे विमान टायर फुटल्यावर धावपट्टीवरच उभे राहिल्याने अन्य विमानांच्या उड्डाणात अडथळा निर्माण झाला होता. या संकटावर उपाय म्हणून तेथे उपस्थित प्रवासी आणि सुरक्षा कर्मचाऱयांना या विमानाला धक्का द्यावा लागला आहे. याप्रकरणी नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाचा दोष अधिक असल्याचे एका युजरने म्हटले आहे. प्राधिकरणाकडे विमानांच्या संचालनासाठी आवश्यक विमानोड्डाण उपकरणे नाहीत. प्राधिकरण एअरलाइन कंपन्यांकडून मोठय़ा प्रमाणात शुल्क आकारते, पण या बदल्यात आवश्यक सुविधा पुरवत नाही. तारा एअरलाइन हिमालयाच्या आव्हानात्मक विमानतळावर विमानसेवा संचालित करत असून बहुतांश नेपाळी लोक याची प्रशंसा करतात असे युजरने म्हटले आहे.

Related Stories

इराणमधील 52 ठिकाणे अमेरिकेच्या निशाण्यावर : डोनाल्ड ट्रम्प

prashant_c

तालिबान अमेरिकेच्या जखमांवर मीठ चोळणार नाही

datta jadhav

विदेशी कर्ज ओझ्यामुळे इम्रान खान अडचणीत

Patil_p

जर्मनीत नवे रूग्ण

Patil_p

महामारीत ‘पॅरेंटिंग’ मोठे आव्हान

Amit Kulkarni

आर्मेनिया-अझरबैजान यांच्यातील युद्धाला पूर्णविराम

datta jadhav
error: Content is protected !!