तरुण भारत

आइस स्केटिंग करणारा श्वान

कधी रस्त्यांवर भटकणारा श्वान आता स्टार

आजपासून काही महिन्यांपूर्वीपर्यंत लेब्राडोर डॉग बेनीला कुणीच ओळखत नव्हते.  तो रस्त्यांवर भटकत होता आणि खूपच आजारी होती. त्याला डॉग शेल्टरमध्ये नेण्यात आले आणि मृत्यूच्या दारात असलेल्या या श्वानाला एका महिलेने दत्तक घेतले. आज हाच श्वान जगातील पहिला आइस स्केटिंग करणारा श्वान म्हणून नाव कमावत आहे.

Advertisements

ज्या महिलेने त्याला दत्तक घेतले होते, ती स्वतः निवृत्त प्रोफेशनल फिगर स्केटर होती. अशा स्थितीत त्यांना बर्फात जाणे पसंत होते. ती स्वतःच्या श्वानालाही सोबत नेत होती. बेनीला बर्फ आवडत असल्याचे आढळून आल्यावर तिने त्याच्यासाठी स्केट्स तयार केले.  मालकीणीची साथ आणि बेनीची आवड या दोन गोष्टींनी त्याला जगातील पहिला स्केटिंग डॉग होण्याचा मान मिळवून दिला.

8 वर्षीय बेनीला उताह येथील एका डॉग शेल्टरमधून वाचविले होते. बेनीच्या डोळय़ांमध्ये प्रचंड प्रेम दिसल्यानेच त्याला घरी आणले. 6 महिन्यांपासून त्याला कुणीच स्वीकारले नव्हते असे श्वानाची मालकीण शेरिल यांनी सांगितले. शेरिल या अमेरिकेच्या लास वेगास शहरात राहतात. नॅशनल हॉकी टीमसाठी एक व्हिडिओ तयार करत असताना शेरिलला श्वानाच्या आइस स्केटिंग टॅलेंटविषयी समजते. बेनीला बर्फात अत्यंत मजा येत होती आणि तो हॉकी स्टिक तोंडात धरून धावत होता असे शेरिल यांनी सांगितले.

प्रशिक्षणानंतर श्वानाची कमाल शेरिल यांनी बेनीला स्केटिंग शिकविण्यास सुरुवात केली. याकरता विशेषरित्या डॉग स्केट्स तयार करवून घेतले आणि अत्यंत सहजपणे त्याने स्केट करणे शिकले. बेनीला स्केटिंग करणे अत्यंत आवडते. तो अनेक कार्यक्रमांमध्ये स्केटिंगसाठी जातो आणि आता अत्यंत प्रसिद्ध ठरला आहे. बेनीचे स्वतःचे टिकटॉक अकौंट असून ज्यावर लाखो फॉलोअर्स आहेत. बेनी अन्य श्वानांच्या तुलनेत खूपच स्मार्ट असून सदैव स्वतःच्या मालकीणीसोबत राहतो.

Related Stories

श्रुतीने घेतला यू टर्न

Patil_p

ओशोच्या शिष्याबाबतचे गूढ उकलणार

Patil_p

ऋतिकसोबत झळकणार नाभा नतेश

Patil_p

कोरोनामुळे वाढले होते वजन : मलायका

Amit Kulkarni

क्रीतिचा ‘मिमि’ ओटीटीवर झळकणार

Patil_p

प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजानचा रस्ते अपघातात मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!