तरुण भारत

जुन्या रुग्णवाहिकांचे सुंदर घरात रुपांतर

अनोख्या कौशल्याद्वारे महिला कमाविते लाखो रुपये

जर हातांमध्ये कौशल्य असेल तर पैसे कमाविण्यासाठी केवळ मेहनत करावी लागते. इंग्लंडच्या ब्रिस्टलमध्ये राहणारी महिला सामंथा बाँडने स्वतःच्या एका अशाच कौशल्याद्वारे लाखोंची कमाई केली आहे. 39 वर्षीय सामंथा युरोपच्या विविध भागांमधील ग्राहकांसाठी जुन्या, गंजलेल्या रुग्णवाहिकांना रंगवून आणि त्यांना सजवून एखाद्या छोटय़ा हॉलिडे होममध्ये रुपांतरित करते. तिच्या या कलेसाठी लोक तिला आनंदापोटी लाखो रुपये देतात. सामंथाचे ग्राहक वेल्स, स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्स इत्यादी देशांमधून येतात आणि एक सुदर मिनी होम ड्राइव्ह करून स्वतःसोबत घेऊन जातात.

Advertisements

सामंथाने स्वतःच्या याच कौशल्याच्या बळावर मोठे कर्ज फेडले आहे. तिच्यावर 30 हजार युरो म्हणजेच सुमारे 30 लाख रुपयांचे कर्ज होते. जुन्या रुग्णवाहिकांना कँपरव्हॅनचे स्वरुप देण्याच्या कामालाच तिने स्वतःचे करियर ठरविले आहे. युरोपमधील जुन्या आणि निरुपयोगी ठरलेल्या रुग्णवाहिकांना काही दिवसांच्या मेहनतीनंतर ती सुंदर कँपरव्हॅनमध्ये बदलून टाकते.

स्वतःच्या या ऍम्ब्युलन्स टर्न्ड कँपरव्हॅन्सला ती 15000-18000 युरो म्हणजेच 16-19 लाख रुपयांमध्ये सहजपणे विकते. या व्हॅन्स तयार करण्यासाठी ती बहुतांश जुन्या गोष्टींचाच वापर करते. याचमुळे प्रत्येक कँपरव्हॅन वेगळी वाटते.

सर्वप्रथम तिने 2012 मध्ये एक रुग्णवाहिका लंडनमध्ये खरेदी केली होती आणि ती तयार करून त्यावर स्वतःचा स्टॅम्प लावून विकली होती. त्यानंतर स्वतःच्या या छंदातून ती पैसे कमावू लागली. एक कँपरव्हॅन तयार करण्यास तिला 6 महिने लागतात. आतापर्यंत तिने 8 रुग्णवाहिका खरेदी केल्या असून त्यातील 5 रुग्णवाहिकांवर काम सुरू आहे. तर 3 रुग्णवाहिका कँपरव्हॅनच्या स्वरुपात सज्ज आहेत.

सामंथाचे क्रिएटिव्ह वर्क पाहून लोक तिची प्रचंड प्रशंसा करतात. तिला एखाद्या डेस्कवर काम करण्याऐवजी स्वतःच्या वर्कशॉपमध्ये कँपरव्हॅन्स तयार करणे अत्यंत आवडते. या कामाने माझे जीवन बदलले असून आणि यामुळे अत्यंत आनंदी असल्याचे सामंथा सांगते.

Related Stories

अभिमानास्पद! वीरपत्नी ‘लेफ्टनंट’ निकिता कौल धौंडियाल भारतीय सैन्यात रुजू

Rohan_P

लॉकडाऊनमध्ये युजर्सच्या मनोरंजनासाठी गुगलकडून डूडलमध्ये कोडिंग गेम

prashant_c

आठवीच्या विद्यार्थ्यासोबत शिक्षिका गेली पळून

prashant_c

हात-पाय गमावले, जिद्द कायम

Patil_p

विठूरायाला अर्पण केलेले दागिने वितळवले जाणार;राज्य सरकारची परवानगी

Sumit Tambekar

कोरोना योद्ध्यांच्या हस्ते यंदा श्री महालक्ष्मी मंदिरात प्रतिष्ठापना

Rohan_P
error: Content is protected !!