तरुण भारत

लिंडसे लोहानची प्रियकरासोबत एंगेजमेंट

हॉलिवूड अभिनेत्री लिंडसे  लोहानने स्वतःचा प्रियकर बाडेर शम्माससोबत एंगजेमेंट केली आहे. यासंबंधीची माहिती लिंडसेनेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. या पोस्टमध्ये लिंडसेने प्रियकर बाडेरसोबतची काही रोमँटिक छायाचित्रे शेअर केली आहेत.

‘माय लव्ह, माय लाइफ, माय फॅमिली, माय फ्यूचर. बाडेर शम्मास लव्ह’ असे तिने छायाचित्रांच्या कॅप्शनमध्ये नमूद पेले आहे. छायाचित्रांमध्ये लिंडसे स्वतःची एंगेजमेंट रिंग दर्शवित असल्याचे दिसून येत आहे. बाडेर हा दुबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन कंपनी क्रेडिट सुइसमध्ये सहाय्यक उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.

Advertisements

‘मीन गर्ल्स’ या चित्रपटातील कसदार अभिनयासाठी लिंडसेला ओळखले जाते. हॉलिवूडमध्ये तिने बाल कलाकार तसेच यशस्वी अभिनेत्री असा प्रदीर्घ प्रवास केला आहे. पॅरेंटस ट्रप या चित्रपटात तिने बालकलाकार म्हणून दुहेरी भूमिका साकारली होती. हा चित्रपट जगभरात गाजला होता. लिंडसेचे नाव यापूर्वी लंडनमधील रशियन अब्जाधीश ईगोर ताराबासोव्हसोबत जोडले गेले होते.

Related Stories

अखेर ‘मुक्त’ झाली ब्रिटनी स्पियर्स

Amit Kulkarni

सामंथाला मिळाला नवा चित्रपट

Patil_p

‘दख्खनचा राजा’ मालिकेत स्थानिक कलाकारांना रोजगाराची संधी

Abhijeet Shinde

तापसी पन्नू, अनुराग कश्यपच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

Rohan_P

…म्हणून मुंबईतील खटले हिमाचलला हलवा; कंगनाची याचिका

Rohan_P

द इंटर्नमध्ये दिसणार अमिताभ बच्चन

Patil_p
error: Content is protected !!