तरुण भारत

‘द रेल्वे मेन’ या मेगाबजेट वेबसीरिजची घोषणा

यशराज फिल्म्सकडून होणार निर्मिती : मुख्य भूमिकेत इरफान खानचा पुत्र बाबिल

बॉलिवूडमधील सर्वात मोठे प्रॉडक्शन हाउस यशराज फिल्म्स ओटीटी कंटेंटच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार असून याची सुरुवात एका मेगाबजेट वेबसीरिजद्वारे होणार आहे. यशराज फिल्म्सने आता याची घोषणा केली आहे. यशराज फिल्म्स ओटीटी प्रोजेक्ट्सची निर्मिती वायआरएफ एंटरटेन्मेंटच्या बॅनर अंतर्गत करणार आहे.

Advertisements

इन्स्टाग्रामवर वायआरएफ एंटरटेन्मेंटच्या पेजसह गुरुवारी पहिला प्रोजेक्ट ‘द रेल्वे मॅन’ची घोषणा करण्यात आली. या वेबसीरिजचे पहिले लुक पोस्टर आणि टीजरही शेअर करण्यात आला. 1984 मध्ये भोपाळमधील गॅसगळतीदरम्यान लोकांच्या सेवेदरम्यान स्वतःच्या जीवची पर्वा न करणाऱया अज्ञात नायकांवर ही वेबसीरिज आधारित असणार असल्याचे सांगण्यात आले. ही वेबसीरिज पुढील वर्षी 2 डिसेंबर रोजी स्ट्रीम करण्यात येईल.

सीरिजची कहाणी चार मुख्य व्यक्तिरेखांवर केंद्रीत असेल. के.के. मेनन, आर. माधवन, दिव्येंदु आणि इरफान खान यांचा पुत्र बाबिल हे या व्यक्तिरेखा साकारत आहेत. फर्स्ट लुक पोस्टरवर या चारही व्यक्तिरेखा दिसून येतात.

डिजिटल प्लॅटफॉर्म स्थापन करण्यासाठी वायआरएफचे प्रमुख आदित्य चोप्रा यांनी सुमारे 500 कोटींचे बजेट ठेवल्याचे वृत्त आहे. याकरता कंटेंटवर वेगाने काम सुरू आहे. द रेल्वे मॅन या वेबसीरिजचे बजेट सुमारे 100 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. के.के. मेनन अलिकडेच स्पेशल ऑप्स 1.5 मध्ये दिसून आले होते. तर माधवन यांच्या नावावर ब्रीद सारखी सीरिज आहे आणि लवकरच ते नेटफ्लिक्सच्या डिकपल्डमध्ये दिसून येणार आहेत. तर दिव्येंदु मिर्झापूर यासारख्या यशस्वी वेबसीरिजमधील कलाकार आहे.

Related Stories

सेटवर तब्बूला झेडप्लस कोरोना कवच

Patil_p

महाराष्ट्राज बेस्ट डान्सरच्या मंचावर आले धर्मेश सरांचे वडील

Patil_p

अमिताभ बच्चन यांना चित्रपटसृष्टीत 52 वर्षे पूर्ण

Amit Kulkarni

आशुतोष पत्कीने शेअर केले क्वॉरंटाईन वेळापत्रक

Patil_p

अभिनेते आणि भाजपचे खासदार सनी देओल यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

रुपेरी पडद्यावर ‘फुलराणी’ अवतरणार

datta jadhav
error: Content is protected !!